शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal : अजित पवार गटात नाराज,शरद पवारांसोबत पुन्हा परत जाणार का? छगन भुजबळांनी थेटच सांगितलं
2
Pakistan out of T20 World Cup : पाऊस आला धावून, पाकिस्तान गेला वाहून! अमेरिका Super 8 मध्ये, रचला इतिहास
3
'शरद पवार माझे आवडते नेते, माझं काम त्यांनी तीन मिनीटांत केलं होतं'; अशोक सराफ यांनी सांगितला किस्सा
4
अमित शहांनी सुरक्षा अधिकाऱ्यांची घेतली बैठक; जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा घेतला आढावा
5
Maharashtra Assembly Session : राज्याचं पावसाळी अधिवेशन ठरलं! अर्थसंकल्प 'या' दिवशी मांडणार, किती दिवस चालणार?
6
मोठी बातमी! अमोल किर्तीकर यांना सीसीटीव्ही फूटेज देण्यास उपनगर जिल्हाधिकाऱ्यांचा नकार
7
इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे केले स्वागत, पाहा व्हिडीओ
8
अजय जडेजानं वन डे वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानला मार्गदर्शन करण्यासाठी एकही रुपया घेतला नाही
9
“छगन भुजबळांनी बंड पुकारून आपले बळ दाखवावे, विधानसभेत धडा शिकवावा”: विजय वडेट्टीवार
10
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: वाह ‘गुरु’! मातीचे सोने करण्याची शक्ती असलेला ग्रह; चंद्राशी ‘युती’ म्हणजे ‘राजयोग’च
11
Maharashtra Politics : 'अजितदादांना सगळीकडून घेरलं,पण पक्षातील कोणच बोलत नाही'; जितेंद्र आव्हाडांनी स्पष्टच सांगितलं
12
“आमचे सरकार आले तर मराठा आरक्षणाची मागणी प्रथम पूर्ण करणार”; जयंत पाटील यांनी दिली गॅरंटी!
13
रशिया-युक्रेन युद्ध थांबणार; राष्ट्राध्यक्ष पुतिन म्हणाले- 'युद्धविरामाला आम्ही तयार, पण...'
14
अजित पवारांच्या विरोधातील मोहीम कुणाच्या इशाऱ्यावर? अण्णा हजारेंच्या भूमिकेवर NCPचा पलटवार
15
“शाहगड येथे कार्यालय सुरू करणार, आंदोलन सोडणार नाही”; मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार
16
ICC ने जाहीर केलं टीम इंडियाचं Super 8 चं वेळापत्रक; जाणून घ्या कधी, केव्हा व कोणाला भिडणार
17
सुनेत्रा पवार यांचा फॉर्म भरताना शिंदे-फडणवीस का नव्हते? अजित दादांनी स्पष्टच सांगितले
18
Photos: तुम हुस्न परी... डिझायनर ड्रेस, फॅशनेबल गॉगल; अवनीत कौरचं 'ग्लॅमरस' फोटोशूट
19
या पेनी स्टॉकच्या खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड, किंमत ₹5 पेक्षाही कमी, एकाच महिन्यात दिला 55% परतावा!
20
RSSच्या मुखपत्रातून राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका; अजित पवारांचे थेट शब्दांत भाष्य, म्हणाले...

अफगानिस्तानात तणाव वाढला; इकडे ड्रायफ्रूट्स महागले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 4:47 AM

पूर्वी काजू, बदाम, मनुका, अक्रोड, अंजीर आदी प्रकारचा सुकामेवा श्रीमंतांच्याच घरात दिसून यायचा; मात्र अलीकडील काळात प्रत्येकाची जीवनशैली बदलली ...

पूर्वी काजू, बदाम, मनुका, अक्रोड, अंजीर आदी प्रकारचा सुकामेवा श्रीमंतांच्याच घरात दिसून यायचा; मात्र अलीकडील काळात प्रत्येकाची जीवनशैली बदलली असून अधिकांश मध्यमवर्गीयांच्या घरातील डब्यांमध्येही सुकामेवा राहायला लागला आहे. दरम्यान, सुक्यामेव्यातील अंजीर, बदाम, मनुका, काजू, पिस्ता, अक्रोड, शहाजिरे आदी अफगाणिस्तानमधून आयात होते; मात्र मागील काही दिवसांत त्याठिकाणी निर्माण झालेल्या तणावपूर्ण स्थितीचा फटका भारतीय ड्रायफ्रूट बाजाराला बसला असून सुक्यामेव्यातील अनेक वस्तूंचा दर ३० ते ४० टक्क्यांनी वाढल्याचे दिसून येत आहे.

.....................

मागणी कायम, साठवणूक मर्यादित

वाशिम शहरातील किराणा दुकानांमधून सुक्यामेव्याला चांगली मागणी आहे. पाटणी चाैकातील मुख्य बाजारात ठोक, किरकोळ विक्रेत्यांची संख्या मोठी आहे. त्यांच्याकडे सध्या उपलब्ध असलेल्या सुक्यामेव्याचे प्रमाण किती, याची नेमकी माहिती कळू शकली नाही. दरम्यान, दर वाढले असले तरी मागणी कायम आहे; मात्र व्यापाऱ्यांनी दुकानांमध्ये साठवणूक मर्यादित स्वरूपात केलेली आहे.

.................

दर कमी होणे आवश्यक

वाशिम शहरात नागरिकांकडून सुक्यामेव्याला मोठी मागणी आहे; मात्र गेल्या काही दिवसांत अनेक वस्तूंचे दर वाढल्याने ही बाब ग्राहकांना असह्य करणारी ठरत आहे. ६०० रुपये किलो असलेला बदाम ९०० रुपयांवर पोहोचला यामुळे अनेकजण दर विचारल्यानंतर खरेदीसाठी टाळाटाळ करीत आहेत.

- श्रीनिवास बत्तुलवार, ड्रायफ्रूट विक्रेते, वाशिम

...............

वाशिम शहरात विशेषत: बदाम, काजू, मनुक्यांना अधिक मागणी आहे; मात्र, दर वाढल्याने खरेदी आणि विक्री दोन्हीवर परिणाम झालेला आहे. यामुळे सर्वसामान्यांना परवडेल असा दर असायला हवे; तरच या क्षेत्रात उलाढाल वाढणार आहे. यामुळे वाढलेले दर कमी होणे आवश्यक आहे.

- नागेश्वर काळे, ड्रायफ्रूट विक्रेते, वाशिम

.............

भाव फलक...

ड्रायफ्रूट तणावापूर्वी तणावानंतर

बदाम ६०० ९००

अंजीर ९०० १२००

अक्रोड ८०० १०००

लिंबूसत्त्व १०० १६०