शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी शिक्षक, विद्यार्थी रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 16:53 IST

विद्यार्थी व शिक्षकांनीच धोकादायक ठरणारे खड्डे बुजविण्यासाठी शुक्रवारी पुढाकार घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - वाशिम तालुक्यातील पार्डी टकमोर येथील फाट्यालगत असलेल्या महामार्गावरील खड्डे बुजविण्यासंदर्भात निवेदन देऊनही रस्ते विकास महामंडळ, बांधकाम विभागाने दखल घेतली नाही. शेवटी विद्यार्थी व शिक्षकांनीच धोकादायक ठरणारे खड्डे बुजविण्यासाठी शुक्रवारी पुढाकार घेतला.वाशिम ते नागपूर या महामार्गावर पार्डी टकमोर फाटा असून, पार्डी टकमारे येथील पारेश्वर विद्यालयात परिसरातून शेकडो विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी सायकल, आॅटो व अन्य वाहनाने येतात. पार्डी टकमोर फाट्यानजीक रस्त्यावर खड्डे असल्याने अपघाताच्या किरकोळ घटना घडतात.  खड्डे बुजविण्यासाठी यापूर्वी स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग वाशिमला निवेदनही दिले होते.  रस्ते विकास महामंडळाकडेही निवेदन दिले होते. त्यावेळी रस्ते विकास महामंडळाचे अभियंता रवि मालवत यांनी लवकरच खड्डे बुजविले जातील, असे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांनाही आश्वासनाचा विसर पडला. दोन्ही निवेदनाची दखल घेण्यात आली नसल्याने शेवटी पारेश्वर विद्यालयाचे शिक्षक महेश उगले, गजानन चौधरी, मोहन चौधरी यांच्यासह विद्यार्थ्यांनी शुक्रवारी धोकदायक ठरणारे खड्डे बुजविले.

टॅग्स :washimवाशिमStudentविद्यार्थीhighwayमहामार्ग