शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी अंतिम टप्प्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 15:53 IST

वाशिम : जिल्हा परिषद शिक्षकांची तात्पुरती सेवाज्येष्ठता यादी तयार केली असून, या यादीवर शिक्षकांकडून आक्षेप मागविण्यात आले आहेत. प्राप्त आक्षेपांचे निराकरण केल्यानंतर सेवाज्येष्ठता यादी अंतिम केली जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा परिषद शिक्षकांची तात्पुरती सेवाज्येष्ठता यादी तयार केली असून, या यादीवर शिक्षकांकडून आक्षेप मागविण्यात आले आहेत. प्राप्त आक्षेपांचे निराकरण केल्यानंतर सेवाज्येष्ठता यादी अंतिम केली जाणार आहे.शासन र्णियानुसार १ जानेवारी या दिनांकावर आधारीत कार्यरत शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी तयार करावी लागते. सेवाज्येष्ठता यादी तयार करण्यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अंबादास मानकर यांच्याशी कास्ट्राईब संघटनेच्या पदाधिकाºयांनी आढावा सभेत प्रश्न उपस्थित केला होता. मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या निर्देशानुसार तात्पूर्ती सेवाज्येष्ठता यादी तयार करून गटशिक्षणाधिकाºयांकडे आक्षेप नोंदविण्यासाठी प्रसिद्ध केली. शिक्षकांनी यादी पाहून त्याची माहिती बरोबर असल्याची स्वाक्षरी केली नसल्याचे किंवा यादीवर एकही आक्षेप नोंदविला नसल्याचेही या आढावा सभेत समोर आले होते. सेवाज्येष्ठता यादी अंतिम होण्यासाठी प्रत्येक शिक्षक, मुख्याध्यापकांनी तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी कार्यालय किंवा केंद्रस्तरावर केंद्र प्रमुखांकडे प्रसिद्ध करण्यात आलेल्या सेवाज्येष्ठता यादीचे वाचन करावे, ही यादी तपासून स्वत:ची माहिती बरोबर असल्याची खात्री करावी आणि चूक असल्यास आक्षेप नोंदवावे, असे आवाहन कास्ट्राईब संघटनेचे जिल्हाध्यक्ष केशव वैद्य यांनी केले. आक्षेपांचे निराकरण झाल्यानंतर या सेवाजेष्ठता यादीनुसार फेब्रुवारी अखेरपर्यंत उच्च श्रेणी मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख पदोन्नती करणे शक्य होईल, असा दावाही करण्यात आला. चूकीच्या माहितीमुळे कोणत्याही शिक्षकांवर अन्याय होणार नाही, यासाठी शिक्षकांनी तात्पुरती सेवाज्येष्ठता यादी काळजीपूर्वक तपासावी, अशा सूचना देण्यात आल्या. कास्ट्राईब संघटनेचे जिल्हाध्यक्ष केशव वैद्य, सचिव हेमंत तायडे, वाशिम तालूकाध्यक्ष प्रभू मोरे,  संतोष पट्टेबहादूर, सुभाष सरतापे, वामन मोरे यांच्यासह शिक्षकांची उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमTeacherशिक्षक