शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने उभारल्या वर्गखोल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 16:09 IST

शिक्षकांनी पुढाकार घेत ग्रामस्थांचे सहकार्य मिळवित स्वखर्चातून वर्गखोल्या उभारुन हा प्रश्न तूर्तास तरी निकाली काढला.

शिष्यांसाठी द्रोणाचार्यांचे असेही योगदान!मेडशी  : येथुन जवळच असलेल्या शंभर टक्के आदिवासी वस्तितील ग्राम वाकळवाडी येथील जि.प. प्राथ व माध्यमीक शाळेत वर्गखोल्यांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांना उघडयावर शिक्षण घेण्याची वेळ आली होती. येथील शिक्षकांनी पुढाकार घेत ग्रामस्थांचे सहकार्य मिळवित स्वखर्चातून वर्गखोल्या उभारुन हा प्रश्न तूर्तास तरी निकाली काढला. शिष्यांसाठी द्रोणाचार्यांच्या या योगदानाबाबत गावकºयांच्यावतिने कौतूक केल्या जात आहे.शाळेत असलेल्या अपुºया वर्गखोल्या पाहता शिक्षकांनी त्यांच्यापरिने खोल्या तर उभारल्यात परंतु खोल्यांसाठी छत नसल्याने ग्रामपंचायतकडे प्रस्ताव सादर केला आहे. वर्गखोल्यांवर छताचे तात्पुरते नियोजन करुन तेथे विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाच्या कार्यास प्रारंभ केला आहे.  येथील जि.प. शाळेमध्ये वर्ग १ ते वर्ग ८ पर्यंत  असून १३३ विद्यार्थी शिक्षण घेत आहे.  वर्गखोल्या मात्र चार त्यामध्येही  चारपैकी एका वर्ग खोलीत शाळेचे कार्यालय व शालेय पोषण आहार ठेवण्यात येतो. पर्याची इयत्ता ४ ते सहावीच्या विद्यार्थ्यांना व्हरांडयात शिक्षणाचे धडे घ्यावे लागत होेते.  विद्यार्थ्यांची होणारी अडचण लक्षात घेता शाळेतील ७ शिक्षकांनी वर्गणी करुन टिनपत्रे व बांबुच्या ताटव्यांच्या तीन वर्ग खोल्या ग्रामस्थांच्या सहाय्याने तयार केल्या.  शिक्षकांबरोबर यामध्ये ग्रामस्थांचे योगदान मोलाचे असुन ग्रा.पं. कडून लवकर निधी मिळविण्याचा प्रयत्न आहे.- गजानन शिंदे, शाळा सुधार शिक्षण समिती अध्यक्ष वाकळवाडी.

 शाळेला लागुन उकीरडे असल्याने यात्रा त्रास सुध्दा विद्यार्थ्यांना होतो. एवढे असले तरी शिक्षक व शाळा समितीने पुढाकाराला प्रोत्साहन व शासन स्तरावरील सहाय्यतेची आवश्यकता आहे. छताकरिता १४ व्या वित्त आयोगांतर्गत टिनपत्रे,  दरवाजे, फर्सीची ग्रा.पं.कडे मागणी केलेली आहे. -बंडू महाले, मुख्याध्यापक जि.प.शाळा वाकळवाडी.

टॅग्स :washimवाशिमTeacherशिक्षकSchoolशाळा