शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

वरिष्ठ वेतन श्रेणीपासून शिक्षक वंचित : न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 16:21 IST

वाशिम : एक ते दीड वर्षांपासून वरिष्ठ वेतन श्रेणीपासुन शिक्षकांना वंचित ठेवल्याने ७ व्या वेतन आयोगातही शिक्षकांना फटका बसण्याची भीती शिक्षकांनी शनिवारच्या बैठकीतून व्यक्त केली. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : एक ते दीड वर्षांपासून वरिष्ठ वेतन श्रेणीपासुन शिक्षकांना वंचित ठेवल्याने ७ व्या वेतन आयोगातही शिक्षकांना फटका बसण्याची भीती शिक्षकांनी शनिवारच्या बैठकीतून व्यक्त केली. या बैठकीला नीलेश कानडे, हरिदास मते, बालाजी मोटे, गोपाल लोखंडे, रवी ठाकरे, बालाजी फताटे, अर्जुन लोंढे, अमर शिंदे, गोविंद पोतदार, प्रवीण म्हातारमारे, राजेश राऊत, गणेश गवई, संदीप सावळे, सचिन खूपसे, महेश जोशी, बेहरे सर, दत्ता ओवांडकर, मंगेश ठाकरे, विनोद दाभाडे, गजानन राऊत, सुरेश मांजरे, महेंद्र चव्हाण आदी बहुसंख्य शिक्षक उपस्थित होते.२३ आॅक्टोबर २०१७ रोजीच्या शासन निर्णयानुसार,शिक्षकांना १२ वर्ष व २४ वर्ष सेवेनंतर लागू होणाºया वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी करिता प्रशिक्षणातील काही बदलांसह नवीन अटी घातल्या आहेत. या शासन निर्णय अन्यायकारक असून, या शासन निर्णयात दुरुस्ती होऊन नवीन शासन निर्णय शासन काढेल, अशी अपेक्षा शिक्षक, कर्मचाºयांना होती. पण शासनाने २१ डिसेंबर २०१८ रोजी वरिष्ठ वेतन श्रेणी व निवडश्रेणी देण्यासंदर्भात आणखी संदिग्ध शासन निर्णय काढून सर्व शिक्षक, कर्मचाºयांना आणखी संभ्रमित केले, असा आरोप बैठकीत करण्यात आला. जानेवारी २०१९ पासून शासनाने ७ वा वेतन आयोग कर्मचाºयांना देण्याबाबत हालचाली सुरू केल्या असताना, २७ आॅक्टोबर २०१७ नंतर सेवेला १२ वर्षे व २४ वर्षे पूर्ण असणाºया शिक्षकांचे या ७ व्या वेतन आयोगात वेतन निश्चिती करताना अतिशय आर्थिक नुकसान होण्याची भीतीही शिक्षकांनी यावेळी वर्तविली. या संदर्भात शासन निर्णयाचे विश्लेषण करून धोरणात्मक लढा उभारण्यासाठी प्राथमिक शिक्षकांनी ही बैठक घेतली. २३ आॅक्टोबर २०१७ च्या शासन निर्णयानुसार पात्र शिक्षकांचे प्रस्तावही एक ते सव्वा वर्ष होऊनही अद्याप मागविले नाहीत ही फार मोठी शोकांतिका असल्याचे हरिदास मते यांनी सांगितले. जिल्हा परिषदेने येत्या एक महिन्यात सदरील शिक्षकांच्या वरिष्ठ वेतन श्रेणी संदर्भात प्रस्ताव स्वीकारून त्यावर अंमलबजावणी करावी अन्यथा वाशिम येथे साखळी उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला. प्राथमिक शिक्षक व शिक्षक संघटना यांना विश्वासात घेऊन साखळी उपोषणाचा निर्णय घेण्यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली.

टॅग्स :washimवाशिमTeacherशिक्षक