शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

धान्य वितरणावर शिक्षक ठेवणार लक्ष!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 10:16 IST

रास्तभाव दुकानावरील धान्य वितरणाचे संनियंत्रण करण्यासाठी शिक्षकाची नेमणूक करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: कोरोना विषाणूच्या प्रसाराला प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. या कालावधीत नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा योग्य दरात होणे आवश्यक आहे. दरम्यान, रास्तभाव दुकानांमध्ये अन्नधान्याचे वितरण सुरळीत होण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागामार्फत उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यानुषंगाने जिल्ह्यातील प्रत्येक रास्तभाव दुकानावरील धान्य वितरणाचे संनियंत्रण करण्यासाठी शिक्षकाची नेमणूक करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला.सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत शिधापत्रिकाधारकांची ई-पॉस मशीनद्वारे बायोमेट्रिक पद्धतीने पडताळणी करून अन्नधान्य वितरण केले जाते; मात्र कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी बायोमेट्रिक पडताळणी न करता रास्तभाव दुकानदाराने स्वत:चे आधार अधिप्रमाणित करून धान्य वाटपाची कार्यवाही करण्याची सुविधा लॉकडाऊन कालावधीत करण्यात आली. या पद्धतीने धान्य वितरण होताना गैरप्रकार होवू नये, यासाठी रास्तभाव दुकानदारांना सूचना देण्यात आल्या. तरीही धान्य वितरणाबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्याने रास्तभाव दुकानातील धान्य वितरणावर नियंत्रण ठेवण्यासाठी शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. यामुळे वितरण गतीने व सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

अन्नधान्य वितरणाचा दैनंदिन अहवाल देणार रास्तभाव दुकानावर नियुक्त केले जाणारे शिक्षक, कर्मचारी यांनी शिधापत्रिकाधारकांना योजनानिहाय दिले जाणारे धान्य, आकाराला जाणारा दर, धान्याची पावती, धान्य वाटप करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी आखणी, मोफत धान्य वाटपाची कार्यवाही आदी बाबींवर नियंत्रण ठेवायचे आहे. तसेच दैनंदिन कामकाजाचा अहवाल संबंधित तालुक्याच्या पुरवठा शाखेस ई-मेल अथवा व्हाटसअ‍ॅप संदेशाद्वारे सादर करावयाचा आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र जाधव यांनी दिली.

जिल्ह्यातील गरजू नागरिकांना रास्त भाव दुकानांमधून जीवनावश्यक वस्तूंचा योग्यरित्या पुरवठा व्हावा, त्यात कुठल्याच प्रकारे गैरप्रकार होऊ नये, यासाठी दक्षता बाळगण्यात येत असून धान्य वितरण संनियंत्राची जबाबदारी शिक्षकांवर सोपविण्यात येणार आहे.- राजेंद्र जाधवजिल्हा पुरवठा अधिकारी, वाशिम

 

 

 

टॅग्स :washimवाशिमTeacherशिक्षक