शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात यंदा ४.१५ लाख हेक्टरवर खरीप पेरणीचे उद्दिष्ट  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 16:09 IST

वाशिम: यंदाच्या खरीप हंगामाची तयारी जिल्हा कृषी विभागाने केली असून, ४.१५ लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे नियोजन केले आहे.

ठळक मुद्देयंदा पीक उत्पादकता वाढविण्यावर कृषी विभागाकडून विशेष भर दिला जाणार आहे. सोयाबीनच्या क्षेत्रात १४ हजार ७४२ हेक्टर, तर तुरीच्या क्षेत्रात ७९८० हेक्टरची वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे.  गतवर्षी जिल्ह्यात ३ लाख ९४ हजार ७११ हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाली होती.

 लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: यंदाच्या खरीप हंगामाची तयारी जिल्हा कृषी विभागाने केली असून, ४.१५ लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे नियोजन केले आहे. यंदा पीक उत्पादकता वाढविण्यावर कृषी विभागाकडून विशेष भर दिला जाणार आहे. त्याशिवाय शेतकºयांसाठी अनुदानित बियाणे व खतांचेही नियोजन करण्यात आले आहे.   कृषी विभागाने यंदाच्या खरीप हंगामाच्या तयारीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांच्या प्रमुख उपस्थितीत खरीप आढावा बैठकीचे आयोजन केले होते. त्यात पीककर्ज वाटप, फळबाग लागवडीचे प्रलंबित अनुदान, उडिद, मुगाच्या उत्पादकतेत झालेली वाढ, बियाण्यांची उगवण क्षमता, खतांचे नियोजन, कृषीपंप जोडण्या आदि मुद्यांवर चर्चा करतानाच खरीप पीक पेरणीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले. वाशिम जिल्ह्यात खरीपाचे क्षेत्र सरासरी ४ लाख ६९६ हेक्टर असताना, गतवर्षी जिल्ह्यात ३ लाख ९४ हजार ७११ हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाली होती. आता यंदाच्या हंगामासाठी कृषी विभागाने ४ लाख १५ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यात नेहमीप्रमाणे सोयाबीनचे क्षेत्र सर्वाधिक २ लाख ९० हजार हेक्टर, तुरीचे क्षेत्र ६० हजार हेक्टर, कपाशीचे क्षेत्र २५ हजार हेक्टर, मुंगाचे क्षेत्र १५ हजार हेक्टर, उडिदाचे क्षेत्र २० हजार हेक्टर, ज्वारीचे क्षेत्र ४ हजार हेक्टर, तिळाचे ३०० हेक्टर आणि इतर खरीप पिकांचे क्षेत्र ७०० हेक्टर आहे. यंदाच्या हंगामात पीक उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी विभाग विशेष प्रयत्न करणार असून, या अंतर्गत शेतीशाळांचे मोठ्या प्रमाणात आयोजन करून पीक उत्पादन पद्धती व पीक संरक्षण पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा प्रसार केला जाणार आहे. सोयाबीनच्या पिकात ९५ टक्के क्षेत्रात आंतरपिक म्हणून तुरीची पेरणी करण्यासाठी शेतकºयांना प्रोत्साहित केले जाणार आहे. यंदा सोयाबीनच्या क्षेत्रात १४ हजार ७४२ हेक्टर, तर तुरीच्या क्षेत्रात ७९८० हेक्टरची वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे.  कपाशीच्या क्षेत्रात घटकृषी विभागाने यंदा खरीप हंगामाचे नियोजन करताना कपाशी आणि ज्वारी या पिकांच्या पेरणीचे उद्दिष्ट कमी केले आहे. जिल्ह्यात कपाशीचे सरासरी क्षेत्र २९ हजार ७०१ हेक्टर असताना यंदा केवळ २५ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीचे, तर वन्यप्राण्यांमुळे ज्वारीच्या पेरणीवर मयार्दा येत असल्याने या पिकाचे क्षेत्र ११६४२ हेक्टर असताना केवळ ४ हजार हेक्टर उद्दिष्ट ठेवले आहे

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी