शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
2
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
3
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
4
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
5
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
6
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
7
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
8
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
9
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
10
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
11
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
12
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
13
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
14
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
15
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
16
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
17
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
18
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
19
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
20
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका

तंटामुक्त समिती अध्यक्ष निवडण्यासाठीच झाला ‘तंटा’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 01:48 IST

तंटामुक्त गाव समितीचा अध्यक्ष निवडण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या ग्रामसभेतच तंटा व हाणामारी झाल्याची घटना तालुक्यातील सोयजना येथे २४ ऑक्टोबर रोजी घडली. परस्पराच्या तक्रारीवरून दोन्ही गटाच्या तब्बल २५ जणांविरुद्ध मानोरा पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. त्यात एका महिला पदाधिकार्‍याचा नवनिर्वाचित सरपंचांनी विनयभंग केल्याचा आरोप ठेवण्यात आला.

ठळक मुद्देसोयजना येथील ग्रामसभेत हाणामारी २५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा: तंटामुक्त गाव समितीचा अध्यक्ष निवडण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या ग्रामसभेतच तंटा व हाणामारी झाल्याची घटना तालुक्यातील सोयजना येथे २४ ऑक्टोबर रोजी घडली. परस्पराच्या तक्रारीवरून दोन्ही गटाच्या तब्बल २५ जणांविरुद्ध मानोरा पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. त्यात एका महिला पदाधिकार्‍याचा नवनिर्वाचित सरपंचांनी विनयभंग केल्याचा आरोप ठेवण्यात आला.सोयजना येथे तंटामुक्तीच्या अध्यक्ष निवडीसाठी ग्रामसभेचे आयोजन केले होते. अध्यक्ष निवडीवरून हाणामारी झाली. प्रथम फिर्यादी सचिन हरिदास राठोड (२३) रा. सोयजना याने पोलिसात दिलेल्या तक्रारीत असे म्हटले की, मी सकाळी ९ वाजतादरम्यान ग्रामसभेला जात असताना नमूद आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून रस्ता अडवून मारहाण व शिवीगाळ केली. या फिर्यादीवरून आरोपी अमित रोहीदास चव्हाण, संदीप ज्ञानेश्‍वर चव्हाण, मनोहर ज्ञानेश्‍वर चव्हाण, अजय युवराज चव्हाण, संकेत दशरथ चव्हाण, सुजीत दशरथ चव्हाण, नितीन नामदेव चव्हाण, वासुदेव  रामहरी चव्हाण, खुशाल पितांबर चव्हाण, रुपेश आत्माराम चव्हाण, नीलेश आत्माराम चव्हाण, शालीक रेाहीदास चव्हाण, संजय चक्रू चव्हाण, अश्‍विन दिलीप चव्हाण, रवींद्र दगडू राठोड व सचिन रोहीदास चव्हाण यांच्याविरुद्ध कलम १४३, १४५, ३२३, ३४१, ५0४,  ५0६ भादंवि अन्वये गुन्हे दाखल केले तर सोयजना येथील एका महिला पदाधिकार्‍यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की,  सकाळी ९ वाजता ग्रामपंचायततर्फे ग्रामसभेचे आयोजन केले होते. सभेच्या आवश्यक कोरम पूर्ण झाल्यानंतर सुरुवात झाली; परंतु वाद झाल्याने सभा तहकूब करण्यात आली. नंतर मी घरी परत जाताना आरोपी विनोद नारायण चव्हाण, अण्णा लक्ष्मण मिसाळ, दीपक किसन कोल्हे, तुळशिराम मेराम राठोड,  श्यामराव राठोड,  नेमीचंद चव्हाण, शंकर लक्ष्मण कोल्हे, विनोद धर्मा चव्हाण, किरण अण्णा मिसाळ यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून विनयभंग करीत अश्लील शिवीगाळ केली. या फिर्यादीवरून उपरोक्त आरोपीविरुद्ध कलम १४३, १४५, ३४१, २९४, ३५४, ५0४, ५0६ भादंवि अन्वये गुन्हे दाखल केले. यातील विनोद नारायण चव्हाण हे नवनिर्वाचित सरपंच आहेत.  प्रकरणाचा तपास ठाणेदार रामकृष्ण मळघने यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार विजय जाधव, दिगांबर राठोड करीत आहे. -

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत