शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

मानोरा शहरात भर पावसाळ्यातही होतोय टँकरने पाणीपुरवठा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 18:30 IST

नगर पंचायतच्यावतीने भर पावसाळ्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

लोकमत न्युज नेटवर्कवाशिम: मानोरा शहराला पाणीपुरवठा करणारी नळयोजना सद्यस्थितीत बंद असल्याने शहरवासियांची पाण्यासाठी गैरसोय होत आहे. ही गैरसोय टाळण्याचा प्रयत्न म्हणून नगर पंचायतच्यावतीने भर पावसाळ्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.मानोरा ग्रामपंचायतचे रुपांतर पाच वर्षांपूर्वी नगर पंचायतमध्ये झाले. नगर पंचायत अस्तित्वात आलेली असतानाही, शहरवासियांना फारशा मुलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. रस्ते, पाणी, वीज यासह आवश्यक त्या सुविधा टप्प्याटप्प्याने उपलब्ध होणे आवश्यक आहे. शहरातील पाणी समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागांतर्गत येत असलेल्या २८ गावे पाणीपुरवठा योजनेत मानोरा शहर समाविष्ठ करून पुरक पाणीपुरवठा योजना काही वर्षांपूर्वी मंजूर झाली होती. या योजनेचे काम पुर्ण झाल्यानंतर शहराला पाणीपुरवठाही झाला. परंतू, पाईपलाईनला गळती, नादुरूस्ती, पाईप फुटणे आदी कारणांमुळे पाणीपुरवठा ठप्प असतो. अकोला ते आर्णी या राष्ट्रीय महामार्गाचे काम चालु असताना, पाणीपुरवठा योजनेचे पाईप फुटल्यामुळे शहराचा पाणी पुरवठा ठप्प झाला. जवळपास एका वर्षापासून ही समस्या कमी-अधिक प्रमाणात भेडसावत आहे. मध्यतंरी पाणीपुरवठा पुर्वत करण्यासाठी नविन पाईप टाकण्याचे काम चालू होते. मात्र ते सुध्दा बंद झाले आहे. आता तर पाणीपुरवठा ठप्पच आहे. पाणी पुरवठा बंद झाल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटंकती करावी लागते. नगर पंचायतने पर्यायी व्यवस्था म्हणून टँकरने पाणीपुरवठा सुरू केला. नागरीकांना १० ते १५ दिवसाआड पाणी मिळते. भर पावसाळ्यातही नागरीकांना टँकरने पाणी पुरवठा होत आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी पाणीपुरवठा योजना पूर्ववत करावी, अशी मागणी शहरवासिंयानी केली. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने, ज्या विहिरीच्या जलपातळीत वाढ झाली, तेथून टँकरने पाणी आणले जात आहे. पाण्याचे शुद्धीकरणही केले जात नसल्याची चर्चा असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाणी नेमके कुठून आणले जाते, याची खातरजमा होणेही आवश्यक आहे.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोराwater scarcityपाणी टंचाई