शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

बसफेऱ्यांसंदर्भात भाजपा पदाधिकाऱ्यांची परिवहन मंत्र्यांशी चर्चा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 15:40 IST

वाशिम : वाशिम, रिसोड येथून अन्य ठिकाणी नवीन बसफेऱ्या सुरू करण्यासंदर्भात भाजपा पदाधिकाऱ्यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी २२ जानेवारी रोजी चर्चा करीत निवेदन दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाशिम, रिसोड येथून अन्य ठिकाणी नवीन बसफेऱ्या सुरू करण्यासंदर्भात भाजपा पदाधिकाऱ्यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी २२ जानेवारी रोजी चर्चा करीत निवेदन दिले. या निवेदनानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन रावते यांनी दिले.जिल्ह्यातील प्रवाशांना बुलडाणा, यवतमाळ, हिंगोली व अन्य ठिकाणी बसने प्रवास करण्यासाठी योग्य त्या प्रमाणात बसफेऱ्या असणे आवश्यक आहे. रिसोड व वाशिम आगारातून पुरेशा प्रमाणात बसफेऱ्या नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. प्रवाशांची गैरसोय दूर करण्याच्या दृष्टिकोनातून भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष लखनसिंह ठाकूर यांनी २२ जानेवारी रोजी राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची मंत्रालयात भेट घेत बसफेºयासंदर्भात चर्चा केली. कारंजामार्गे रिसोड ते यवतमाळ, पुसद मार्गे रिसोड ते यवतमाळ, लोणार,रिसोड मार्गे पुसद ते पुणे तसेच कळमनुरी, हिंगोली, सेनगाव मार्गे उमरखेड ते शेगाव, रिसोड मार्गे पांढरकवडा ते पुणे आणि मानोरा, पोहरादेवी रिसोड मार्गे लोणार ते दिग्रस अशा सात नवीन बसफेऱ्या सुरू करण्याची आग्रही मागणी यावेळी ना. रावते यांच्याकडे करण्यात आली. या बसफेऱ्या सुरू झाल्या तर महामंडळाच्या उत्पन्नातदेखील वाढ होईल, अशी अपेक्षाही व्यक्त केली. निवेदनानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन ना. रावते यांनी दिल्याची माहिती लखनसिंह ठाकूर यांनी दिली. यावेळी भाजपा ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस सुनील बेलोकर, देवीदास नागरे, नंदकिशोर मगर, विठ्ठलराव अवचार आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोडDiwakar Raoteदिवाकर रावतेstate transportराज्य परीवहन महामंडळ