शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

गोड बोला, गुड बोला : गोड बोलण्यासाठी जीभ नावाचे इंद्रिय कह्यात हवे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 17:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : गोड बोलून समोरच्याला जणू हरभºयाच्या झाडावर बसविले की झाले. त्यासाठी मात्र जीभ नावाचे आपले ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गोड बोलून समोरच्याला जणू हरभºयाच्या झाडावर बसविले की झाले. त्यासाठी मात्र जीभ नावाचे आपले इंद्रिय आपल्या कह्यात पाहिजे. अर्थात हे सगळ्यांनाच जमते असे नाही; पण ज्यांना जमते ते सर्वसुखी म्हणता येतील. त्याचाही अभ्यासच हवा. त्यांच्यासाठी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, श्रोत्रादि इंद्रिये आवरिती/ परि रसने नियमु न करिती/ ते सहस्रधा कवळिजती/ विषयीं इहीं//‘पिंडे पिंडे मतिर्भिन्न:’ असे शास्रवचन आहे. स्थिरमती, शुद्धमती, विक्षिप्तमती, अल्पमती, मंदमती असे मतीनुसार माणसांचे प्रकार पडतात. कोण कशा मतीचा आहे, हे ओळखणे फारसे अवघड नसते. समोरचा माणूस ओळखीचा नसेल आणि तो एक शब्दही बोलला नाही तरी त्याची मती कशाप्रकारची असू शकते हे मुद्राभ्यासाने काही प्रमाणात ओळखता येऊ शकते. तुमच्या विचारांची बैठक कशी आहे, हे वाचा स्पष्ट करते. त्यामुळे शहाणी माणसे मोजकं बोलतात. ‘बोलु ऐसे बोले, तेणे विठ्ठल विठ्ठल डोले’ ही बोलण्यातील ताकद अंगी असणारी माणसे फार विरळ असतात.सामान्य आणि असामान्य अशी माणसांची वर्गवारी विचारात घेतली तर असामान्यांसाठी ‘गोड बोला’ हा संदेश असणारच नाही. कारण त्यांना तसे सांगण्याची गरज नसते. तेथे ‘झरा मुळचाची खरा’ असतो. प्रश्न असतो सामान्य जनांचा. यातली एक जमात धूर्त, बेरकी, लबाड, स्वार्थी, कपटी, संधीसाधू, दीर्घद्वेषी, संकुचित प्रवृत्तीची, इतरांना फसवण्यात धन्यता मानणारी इत्यादि स्वभाव वैशिष्टे असणारी असते. त्यांना शब्दाची किंमत काय कळणार? अशी माणसे समोरच्याला कितीही गोड बोलली तर त्याला ते पटणारे नसते. त्यामुळे इतरेजन त्यांच्या गोड बोलण्याला फसत नाहीत. तुकाराम महाराजांनी ‘बोल बोलता सोपे वाटे, करणी करता टीर फाटे’ असे सडेतोडपणे सांगितले आहे.  ‘गोड बोला’ असे म्हणणे सोपे; पण ‘गोड बोलणे’, हे नेमके कुठून यायला हवे. जेथून ते येणे अपेक्षित आहे, तेथून ते खरेच येते का, हा खरा प्रश्न आहे. त्याचा विचार प्रत्येकाने करणे गरजेचे आहे.

टॅग्स :washimवाशिमLokmat Eventलोकमत इव्हेंट