शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

डेटा कार्ड शुल्कापोटी राज्यातील तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांना मिळणार १२.६३ कोटी रुपये !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2020 11:07 AM

महसूल विभागाने २ सप्टेंबर रोजी शुल्क प्रतिपूर्तीसाठी १२.६३ कोटींचा निधी मंजूर केला.

वाशिम : राज्यात डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन कार्यक्रमांतर्गत ई-फेरफारच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांच्या लॅपटॉप स्टेटडेटा सेंटरवरील सर्व्हरबरोबर जोडणी करण्यासाठी डेटा कार्डद्वारे कनेक्टिव्हिटी स्थापित करण्यात आली. परंतू, दोन वर्षात डेटा कार्ड शुल्काची प्रतिपूर्ती शासनाकडून तलाठी, मंडळ अधिकाºयांना झाली नव्हती. अखेर महसूल विभागाने २ सप्टेंबर रोजी शुल्क प्रतिपूर्तीसाठी १२.६३ कोटींचा निधी मंजूर केला.राज्यात डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन कार्यक्रमांतर्गत सातबारा, आठ-अ, ई-फेरफार, ई-अभिलेख आदींना आॅनलाईनची जोड देण्यात आली. ई-महाभूमीअंतर्गत ई-फेरफार आज्ञावलीच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील तलाठी, मंडळ अधिकाºयांच्या लॅपटॉपची स्टेट डेटा सेंटरवरील सर्व्हरशी जोडणी केली होती. यासाठी डेटाकार्डद्वारे कनेक्टिव्हिटी स्थापित करून सेवा देण्यात आली. दुसरीकडे एप्रिल २०१९ ते मार्च २०२० या कालावधीतील डेटाकार्ड शुल्काची प्रतिपूर्ती राज्यातील तलाठी, मंडळ अधिकाºयांना शासनाकडून करण्यात आली नाही. डेटाकार्ड शुल्क प्रतिपूर्तीसाठी १२ कोटी ६३ लाख तीन हजार रुपयांची तरतूद करावी, अशी मागणी तलाठी, पटवारी, मंडळ अधिकारी समन्वय महासंघाने महसूल विभागाकडे लावून धरली. कोरोनाच्या पृष्ठभूमीवर निधीची तरतूद करताना विलंब झाला. शेवटी २ सप्टेंबर रोजी महसूल विभागाने १२.६३ कोटींचा निधी मंजूर केल्याने राज्यातील तलाठी, मंडळ अधिकाºयांना लवकरच डेटाकार्ड शुल्काची प्रतिपूर्ती मिळणार आहे. राज्यातील १५ हजार तलाठी, मंडळ अधिकाºयांना डेटाकार्ड शुल्क प्रतिपूर्ती मिळाली नव्हती. यासंदर्भात वरिष्ठांशी पाठपुरावा केला. शेवटी २ सप्टेंबर रोजी निधी मंजूर झाला. त्यामुळे तलाठी, मंडळ अधिकाºयांना लवकरच डेटाकार्ड शुल्क प्रतिपूर्ती मिळणार आहे.- शाम जोशीराज्याध्यक्ष, तलाठी, पटवारी, मंडळ अधिकारी महासंघ

टॅग्स :washimवाशिमRevenue Departmentमहसूल विभाग