शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 15:03 IST

शेतकऱ्यांना रास्त भावात दर्जेदार कृषी निविष्ठांचा पुरवठा करावा, अशा सूचना कृषी अधिकाऱ्यांनी कृषी सेवा केंद्र संचालकांना सोमवारी दिल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेऊन मागणीनुसार शेतकऱ्यांना रास्त भावात दर्जेदार कृषी निविष्ठांचा पुरवठा करावा, अशा सूचना कृषी अधिकाऱ्यांनी कृषी सेवा केंद्र संचालकांना सोमवारी दिल्या. वाशिम पंचायत समितीच्या कृषी विभागातर्फे २७ मे रोजी आयोजित खरीप हंगामपूर्व प्रशिक्षणात कृषी अधिकाऱ्यांनी कृषी सेवा केंद्र संचालकांना मार्गदर्शन केले.या प्रशिक्षणाला जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, कृषी विकास अधिकारी प्रल्हाद शेळके, मोहीम अधिकारी नरेंद्र बारापात्रे, वाशिम पंचायत समितीचे कृषी अधिकारी रमेश भद्रोड, कृषी व्यवसायिक संघटनेचे राज्य अध्यक्ष जगनाथ काळे, सुभाष दरक, जिल्हा अध्यक्ष सुनील पाटील यांच्यासह तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांचे संचालक उपस्थित होते.जिल्ह्याच्या मागणीनुसार बियाणे आणि खते उपलब्ध होत असून, शेतकºयांची गैरसोय किंवा फसवणूक होणार नाही, याची दक्षता प्रत्येकाने घ्यावी अशा सूचना उपस्थित कृषी अधिकाºयांनी दिल्या. अनुदानित खते वितरण करताना पॉस मशिनचाच वापर करावा, किटकनाशके हाताळताना घ्यावयाची काळजी, बंदी घातलेले किटकनाशके व त्याबाबतचे नियम, गुलाबी बोंड अळीपासून बचाव करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना, मका पिकावरील नव्याने येऊ घातलेल्या अळीबाबत जनजागृती आदी विषयांवर दत्तात्रय गावसाने, प्रल्हाद शेळके, नरेंद्र बारापात्रे आदींनी मार्गदर्शन केले. पॉस मशिनबाबत उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले. खरिप हंगाम तोंडावर आला असून प्रत्येकाने शेतकºयांच्या सेवेसाठी सज्ज राहावे, अशा सूचनाही कृषी अधिकाºयांनी दिल्या.  गैरहजर संचालकांना कारणे दाखवा२७ मे रोजी वाशिम पंचायत समितींतर्गत येणाºया कृषी सेवा केंद्रांच्या संचालकांना खरिप हंगामपूर्व प्रशिक्षण देण्यात येणार असून, या प्रशिक्षणाला सर्व केंद्र संचालकांनी उपस्थित राहण्याच्या सूचना कृषी विभागाने दिल्या होत्या. काही संचालक या प्रशिक्षणाला उपस्थित राहिले नसल्याची बाब निदर्शनात आली. प्रशिक्षणाला गैरहजर राहणाºया संचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे, अशी माहिती कृषी अधिकारी रमेश भद्रोड यांनी दिली.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी