शहरं
Join us  
Trending Stories
1
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
2
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
3
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
4
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा खोचक टोला
5
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
6
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
7
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
8
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
9
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
10
Mithilesh Tiwari: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
11
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
12
Travel : जगाचा निरोप घेण्यापूर्वी 'या' १५ पर्यटन स्थळांचा अनुभव नक्की घ्या; आयुष्य सार्थकी लागेल!
13
'काम हवं असेल तर तडजोड करावी लागेल!' प्रसिद्ध युट्यूबरच्या पत्नीकडे मागणी; ब्लॅकमेल केल्याचीही माहिती
14
नेपाळमध्ये पंतप्रधान होताच बालेन शाह यांचा 'भारतविरोधी' अवतार! ४५ दिवसांत घेतले ४ मोठे निर्णय
15
Hardik Pandya: हार्दिक पांड्याने आधी अनफॉलो केलं, मग फॉलो केलं; गोंधळावर मुंबई इंडियन्सने दिली प्रतिक्रिया
16
Telangana Accident: स्पोर्ट्स बाईक आणि कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांसह ५ जण ठार!
17
अजबच! SBI च्या एटीएममध्ये सुरू आहे सलून, पैसे काढण्यासाठी येणारे होताहेत अवाक्, नेमका प्रकार काय?
18
'२०२६ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कोसळण्याच्या मार्गावर..,' रॉबर्ट कियोसाकी यांनी दिला आणखी एक मोठा इशारा
19
Google New QR Code: गुगलचा मास्टर प्लॅन! आता QR कोड स्कॅन केल्याशिवाय कोणतीही वेबसाईट उघडणार नाही; पाहा काय आहे नवा नियम
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईसंदर्भात घागरफोड आंदोलन

By admin | Updated: May 24, 2016 01:52 IST

वाशिम नगर परिषदने उपाययोजना करण्याची मागणी.

वाशिम: शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात असर्मथ ठरल्याचा आरोप करीत, नगर परिषदेच्या धोरणाचा विरोध म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने वाशिम नगर परिषद कार्यालयासमोर २३ मे रोजी घागरफोड आंदोलन करण्यात आले.
शहरात उद्भवलेली भीषण पाणीटंचाई, एकबुर्जी धरणातील मृत जलसाठा व खासगी टँकरधारकांकडून होणारी आर्थिक लूट आदींच्या पृष्ठभूमीवर शहरातील सर्व विहिरी व बोअरवेल अधिग्रहित करून प्रत्येक प्रभागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने न.प. मुख्याधिकार्‍यांना निवेदन देऊन केली होती; मात्र नगर परिषदेने यासंदर्भात कोणतीच कार्यवाही न केल्यामुळे मनसेच्या वतीने जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्‍वर जाधव यांच्या नेतृत्वात घागरफोड आंदोलन केले. या आंदोलनात मनसेचे शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला पदाधिकारी सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांनी नगर परिषद कार्यालयासमोर घागर फोडून नगर नागरिकांना खासगी टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली. यावेळी मनसेचे निवेदन स्वीकारण्यास नगर परिषदेमध्ये एकही जबाबदार अधिकारी हजर नव्हता. वाशिम नगर परिषदेचा ह्यबह्ण वर्ग दर्जा असून शहरातील नागरिकांना स्वखर्चाने टँकरने पाणीपुरवठा करण्याचा अधिकार नगर परिषदेचा आहे. यासंदर्भातील शासन निर्णयही न.प.ला देण्यात आलेला आहे; मात्र मुख्याधिकार्‍यांना शहरातील नागरिकांच्या समस्यांशी काहीही देणे- घेणे नाही, असा आरोप जिल्हाध्यक्ष जाधव यांनी केला. नगर परिषदेने नागरिकांना पाणीपुरवठा न केल्यास यापुढे अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही ज्ञानेश्‍वर जाधव यांनी दिला.