शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

'...तर स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लढणार'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 16:15 IST

वाटाघाटी फिस्कटल्यास शेतकरी हितास्तव ‘स्वाभिमानी’ वेळप्रसंगी स्वबळावर लढणार, असे घणाघाती प्रतिपादन ‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी येथे रविवार, २३ डिसेंबरला केले. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पुर्वीपेक्षा सद्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विस्तार वाढलेला आहे. त्यामुळे महाआघाडीत स्वाभिमानी शेतकरी पक्षाने सहा जागांवर दावा केला आहे. एका जागेवर अजिबात समाधान मानले जाणार नसून महाआघाडीने उपकाराची भाषा बोलून आम्हाला गृहित धरू नये. याऊपरही वाटाघाटी फिस्कटल्यास शेतकरी हितास्तव ‘स्वाभिमानी’ वेळप्रसंगी स्वबळावर लढणार, असे घणाघाती प्रतिपादन ‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी येथे रविवार, २३ डिसेंबरला केले. स्थानिक विश्रामगृहात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, की गेल्या साडेचार वर्षांच्या कार्यकाळात राबविलेल्या जनविरोधी धोरणांमुळे रोष ओढवून घेतलेल्या विद्यमान भाजपा सरकारला खाली खेचण्यासाठी सर्वच घटक पक्षांनी एकत्रित येवून निवडणूक लढावी, अशी जनतेचीच अपेक्षा आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने या जनमताचा आदर राखून जमिनीवरच राहावे, असे तुपकर म्हणाले. सत्तापरिवर्तनात शेतकºयांची भुमिका सर्वात मोठी असून पाच राज्यातील निवडणुकीच्या निकालांनी हे सिद्ध केले आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ‘स्वाभिमानी’चे संस्थापक अध्यक्ष तथा विद्यमान खासदार राजू शेट्टी यांचे प्राबल्य आहे. त्यामुळे हा मतदारसंघ ‘स्वाभिमानी’ला सोडण्याची उपकारित भाषा महाआघाडीने करू नये. ‘स्वाभिमानी’ने यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी बुलडाणा, वर्धा, माढा, कोल्हापूर, सांगली आणि धुळे या सहा जागांवर दावा केला आहे. तो शेवटपर्यंत कायम राहणार असून त्यात कुठलाच बदल आम्हाला मान्य नाही. तसेही शेतकºयांच्या प्रश्नांवर अहोरात्र झटणाºया राजू शेट्टी यांना सोबत घेतल्याशिवाय निवडणूक जिंकणे सोपे नसल्याने महाआघाडीने आम्हाला गृहित धरून केवळ एक जागा दिल्यास तिसरी आघाडी उघडून ‘स्वाभिमानी’ स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाईल, असेही रविकांत तुपकर यांनी यावेळी सांगितले. पत्रकार परिषदेला ‘स्वाभिमानी’चे जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :washimवाशिमSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाPoliticsराजकारणRavikant Tupkarरविकांत तुपकर