शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

देवा सरकारला सद्बुद्धी दे!...स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मालेगावात केले होमहवन आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 17:09 IST

मालेगाव (वाशिम) : वयोवृद्ध शेतकरी धर्मा पाटील यांच्या झालेल्या मृत्यूच्या पृष्ठभूमिवर भगवंत रामाने आतातरी विद्यमान शासनाने सद्बुद्धी प्रदान करावी, अशी याचना करणारे आगळेवेगळे होमहवन आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ३० जानेवारीला येथील श्रीराम मंदिरात केले. 

ठळक मुद्देस्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मालेगावातील शिव चौकस्थित श्रीराम मंदिरात ३० जानेवारीला दुपारी १ वाजता होमहवन करण्यात आला. तसेच शेतकरी धर्मा पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

मालेगाव (वाशिम) : वयोवृद्ध शेतकरी धर्मा पाटील यांच्या झालेल्या मृत्यूच्या पृष्ठभूमिवर भगवंत रामाने आतातरी विद्यमान शासनाने सद्बुद्धी प्रदान करावी, अशी याचना करणारे आगळेवेगळे होमहवन आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ३० जानेवारीला येथील श्रीराम मंदिरात केले. धुळे जिल्ह्यातील विखरण (ता.शिंदखेडा) येथील ८० वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांनी सौरऊर्जा प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा, यासाठी मंत्रालयापर्यंत पाठपुरावा केला. मात्र, त्याची कुणीच दखल न घेतल्याने धर्मा पाटील यांनी २२ जानेवारी रोजी अखेर मंत्रालयातच विष प्राशन केले. रविवारी रात्री उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. तथापि, शासनाने धर्मा पाटील यांच्या मागणीची वेळीच दखल घेतली असती तर ही वेळच ओढवली नसती. त्यामुळे विद्यमान शासनाला भगवान रामा ने किमान आतातरी सद्बुद्धी द्यावी, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मालेगावातील शिव चौकस्थित श्रीराम मंदिरात ३० जानेवारीला दुपारी १ वाजता होमहवन करण्यात आला. तसेच शेतकरी धर्मा पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दामुअण्णा इंगोले, दत्ता जोगदंड, ओमप्रकाश गायकवाड, उमेश आंधळे, रवि लहाने, प्रमोद कुटे उपस्थित होते.

टॅग्स :washimवाशिमagitationआंदोलन