शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज तातडीने सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 13:29 IST

वाशिम : सर्व शासकीय, निमशासकीय, अनुदानित, कायम विना अनुदानित महाविद्यालयांतील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क व व्यावसायिक अभ्यासक्रमांना निर्वाह भत्ता योजनेचे सन २०१८-१९ या शैक्षणिक वषार्तील अर्ज शासनाच्या संकेतस्थळावर भरण्याबाबत शासनाने निर्देशित केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सर्व शासकीय, निमशासकीय, अनुदानित, कायम विना अनुदानित महाविद्यालयांतील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क व व्यावसायिक अभ्यासक्रमांना निर्वाह भत्ता योजनेचे सन २०१८-१९ या शैक्षणिक वषार्तील अर्ज शासनाच्या संकेतस्थळावर भरण्याबाबत शासनाने निर्देशित केले आहे. ३० नोव्हेंबर २०१८ ही अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख असून त्यानंतर या संकेतस्थळावर अर्ज भरता येणार नाहीत. सर्व महाविद्यालयांनी या विद्यार्थ्यांना ३० नोव्हेंबर २०१८ पूर्वी अर्ज सादर करण्याच्या सूचना द्याव्यात, असे निर्देश अकोला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पच्या प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांनी दिले. महाराष्ट्र शासनाने  शिष्यवृत्तीसाठी नवीन संकेतस्थळ विकसित केले असल्याने सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षातील शिष्यवृत्तीचे अर्ज याच शैक्षणिक वर्षात भरणे बंधनकारक आहे. या वर्षीचे अर्ज पुढील शैक्षणिक सत्रात भरता येणार नाहीत. या कारणामुळे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची राहील, असा इशाराही प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांनी दिला. आॅनलाईन पद्धतीने शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करण्याच्या सूचना यापूर्वीच महाविद्यालय व विद्यार्थ्यांना देण्यात आल्या होत्या. तथापि अद्याप काही विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज सादर केले नाहीत. विद्यार्थ्यांनी ३० नोव्हेंबरपर्यंत शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करावे. शिष्यवृत्तीचे अर्ज आॅनलाईन भरावयाचे असल्याने विद्यार्थ्यांच्या अर्जांची प्रिंट व विद्यार्थ्यांची संपूर्ण कागदपत्रे संबंधित महाविद्यालयांनी जतन करून ठेवावीत, महाविद्यालयीन स्तरावरून विद्यार्थ्यांना सूचना देण्यात याव्या, अशा सूचना सोनवणे यांनी दिल्या.

टॅग्स :washimवाशिमEducation Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थी