शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यात ‘फायर आॅडिट’ करून अहवाल सादर करा! वाशिम जिल्हाधिकाऱ्यांचा नगर परिषदांना ‘अल्टीमेटम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 14:57 IST

वाशिम: जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी जिल्ह्यातील सर्व नगर परिषद, नगर पंचायतींना येत्या दोन महिन्यात प्रशासकीय कार्यालये, व्यापारी संकुल तथा सार्वजनिक ठिकाणी चालणाऱ्या व्यावसायिक दुकानांचे ‘फायर आॅडिट’ करून तसा अहवाल सादर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. 

ठळक मुद्देव्यापारी संकुलांचे नियमित अग्निसुरक्षा व्यवस्था परिक्षण (फायर आॅडिट) व्हायला हवे. व्यावसायिकांची उदासिनता आणि प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे गेल्या ५ वर्षांपासून एकाही व्यापारी संकुलाचे ‘फायर आॅडिट’ झाले नाही. याप्रकरणी ‘लोकमत’ने २ जानेवारीच्या अंकात सर्वंकष वृत्त प्रकाशित करून हा मुद्दा उजेडात आणला होता.

वाशिम: सदोदित ग्राहकांच्या गर्दीने गजबजणाऱ्या जिल्ह्यातील व्यापारी संकुलांचे नियमित अग्निसुरक्षा व्यवस्था परिक्षण (फायर आॅडिट) व्हायला हवे. मात्र, व्यावसायिकांची उदासिनता आणि प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे गेल्या ५ वर्षांपासून एकाही व्यापारी संकुलाचे ‘फायर आॅडिट’ झाले नाही. दरम्यान, या विषयावर ‘लोकमत’ने व्यापारी संकुलांमधील अग्निसुरक्षा व्यवस्थेचा बोजवारा, या मथळ्याखाली २ जानेवारीच्या अंकात सर्वंकष वृत्त प्रकाशित केले. त्याची दखल घेवून जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी जिल्ह्यातील सर्व नगर परिषद, नगर पंचायतींना येत्या दोन महिन्यात प्रशासकीय कार्यालये, व्यापारी संकुल तथा सार्वजनिक ठिकाणी चालणाऱ्या व्यावसायिक दुकानांचे ‘फायर आॅडिट’ करून तसा अहवाल सादर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. २१ जून २०१२ रोजी मुंबई मंत्रालयाच्या मुख्य इमारतीस लागलेल्या भीषण आगीची शासनाने गंभीर नोंद घेवून २२ जून २०१२ रोजी महत्वपूर्ण अध्यादेश पारित करत नागरी स्थानिक स्वराज्य संस्था व विशेष नियोजन प्राधिकरणांनी त्यांच्या स्वमालकीच्या सार्वजनिक इमारती, कार्यालये तसेच त्यांच्या कार्यक्षेत्रातील व्यापारी संकुलांमधील अग्निसुरक्षा व्यवस्थेचे परीक्षण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, २०१२ मध्ये शासकीय कार्यालयांसह सार्वजनिक ठिकाणी असणाºया इमारतींच्या अग्निसुरक्षा व्यवस्था परीक्षणाचे सोपस्कार पार पाडण्यात आले. मात्र, तेव्हापासून या गंभीर बाबीकडे कुणीही लक्ष पुरविलेले नाही. दरम्यान, अचानक आग लागल्यास त्यापासून बचावासाठी आवश्यक असलेले अग्निरोधक यंत्र बहुतांश प्रशासकीय कार्यालये, व्यापारी संकुलांमध्ये लावण्यात आलेले नाहीत. विशेष गंभीर बाब म्हणजे नगर परिषदांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात वर्षातून दोनवेळा ‘फायर आॅडिट’ करण्याचे बंधन असताना प्रशासनाचेही त्याकडे दुर्लक्ष झाले. याप्रकरणी ‘लोकमत’ने २ जानेवारीच्या अंकात सर्वंकष वृत्त प्रकाशित करून हा मुद्दा उजेडात आणला होता. त्याची दखल घेवून जिल्हाधिकाºयांनी मंगळवार, ८ जानेवारीला जिल्ह्यातील सर्व नगर परिषदांना पत्र पाठवून येत्या दोन महिन्यात ‘फायर आॅडिट’ करून तसा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

टॅग्स :washimवाशिमWashim Collector officeवाशिम जिल्हाधिकारी कार्यालयfireआग