शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

१.२९ लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत पाठ्यपुस्तके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 12:21 IST

१.२९ लाख विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके मिळणार असून, ७.०३ लाख पैकी आतापर्यंत ५.९१ लाख पाठयपुस्तके शिक्षण विभागाला प्राप्त झाली.

वाशिम : शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व अनुदानित शाळांमध्ये इयत्ता पहिले ते आठवीतील सर्व माध्यमाच्या शिक्षण घेणाऱ्या जिल्हयातील १.२९ लाख विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके मिळणार असून, ७.०३ लाख पैकी आतापर्यंत ५.९१ लाख पाठयपुस्तके शिक्षण विभागाला प्राप्त झाली.विद्यार्थ्यांची १०० टक्के उपस्थिती टिकविणे, गळतीचे प्रमाण शून्यावर आणणे, पाठ्यपुस्तकांपासून कुणीही वंचित राहू नये म्हणून समग्र शिक्षा अभियानातून शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व अनुदानित शाळांमधील इयत्ता पहिले ते आठवीतील सर्व माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकाचे वितरण केले जाते. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने विद्यार्थी संख्येनुसार सात लाख ३ हजार ११२ पाठ्यपुस्तकांची मागणी नोंदविली होती. यामध्ये कारंजा तालुक्यातील १९ हजार ४४४ विद्यार्थ्यांना एक लाख ९ हजार ६९१ पाठ्यपुस्तके, मालेगाव तालुक्यात २० हजार ५९९ विद्यार्थ्यांना एक लाख १५ हजार ८७५ पाठ्यपुस्तके, मंगरूळपीर तालुक्यात १७ हजार ३४७ विद्यार्थ्यांना एक लाख ४९० पाठ्यपुस्तके, मानोरा तालुक्यात १६ हजार ५३३ विद्यार्थ्यांना ९२ हजार ३०९ पाठ्यपुस्तके, रिसोड तालुक्यात २६ हजार १०३ विद्यार्थ्यांना एक लाख १७ हजार ५३३ पाठ्यपुस्तके तर वाशिम तालुक्यात २९ हजार १७ विद्यार्थ्यांना एक लाख ६७ हजार २१४ पाठ्यपुस्तकांचे वाटप होणार आहे. ९ जून पर्यंत जिल्ह्याला ५ लाख ९१ हजार ३८७ पाठ्यपुस्तके प्राप्त झाली. सदर पाठ्यपुस्तके ही संबंधित पंचायत समितीच्या ाटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत मुख्याध्यापकांकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत. जिल्हास्तरावरून ही पाठ्यपुस्तके पंचायत समिती स्तरावर पाठविण्याची कार्यवाही सध्या सुरू आहे. यावर्षी कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी ३० जूनपर्यंत लॉकडाऊन आहे. शाळा नेमक्या कधी सुरू होणार हे अद्याप निश्चित नाही. तथापि, ऐनवेळी पाठ्यपुस्तकासंदर्भात धांदल उडू नये म्हणून मोफत पाठ्यपुस्तकांची मागणी नोंदवून आतापर्यंत ५ लाख ९१ हजार ३८७ पाठ्यपुस्तके प्राप्त करून घेण्यात आली.

टॅग्स :washimवाशिमEducation Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थी