शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणार अर्थसहाय्य !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 14:14 IST

विद्यार्थ्यांनी समाजकल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालय येथे विहित नमुन्यातील अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी केले.

ठळक मुद्देमहाराष्ट्राचे रहिवासी असलेले अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असतील.शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमास विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला असावा. ही योजना जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या महाविद्यालयामध्ये प्रवेशित असणाºया विद्यार्थ्यांना लागू राहिल.

 लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या, परंतु वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अथवा प्रवेश न घेतलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता इत्यादी सुविधा स्वत: उपलब्ध करून घेण्यासाठी राज्य शासनाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेंतर्गत जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी शिक्षण घेत असलेल्या व जिल्हा मुख्यालय क्षेत्राबाहेरील वास्तव्य असलेल्या विद्यार्थ्यांनी समाजकल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालय येथे विहित नमुन्यातील अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी केले.महाराष्ट्राचे रहिवासी असलेले अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असतील. शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमास विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थ्याने स्वत:चा आधार क्रमांक, त्याने ज्या राष्ट्रीयकृत, शेड्युल्ड बँकेत खाते उघडले आहे, त्या खात्याशी संलग्न करणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न २.५० लाखापेक्षा जास्त नसावे. ही योजना जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या महाविद्यालयामध्ये प्रवेशित असणाºया विद्यार्थ्यांना लागू राहिल. तथापि, विद्यार्थी स्थानिक नसावा, म्हणजेच वाशिम जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी ठिकाणी प्रवेश घेतल्यास तो विद्यार्थी वाशिम नगरपालिका क्षेत्रातील रहिवासी नसावा. विद्यार्थी ११ वी, १२ वी व १२ वी नंतर व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेशित असावा. ११ वी मध्ये प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यास १० वी मध्ये किमान ५० टक्के गुण असणे अनिवार्य आहे. तसेच पदवी, पदव्युत्तर शिक्षणाकरिता १२ वी मध्ये ५० टक्के गुण असणे अनिवार्य आहे. १२ वी नंतर पदवी, पदविका तसेच पदवी नंतर पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षापेक्षा कमी नसावा. विद्यार्थ्यांची निवड गुणवत्तेच्या आधारावर होणार आहे. या अटी पूर्ण करणाºया अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चिखली रोड, वाशिम येथे संपूर्ण कागदपत्रांसह विहित नमुन्यातील अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाजकल्याण कार्यालयामार्फत करण्यात आले.

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजनाStudentविद्यार्थी