शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांची प्रतीक्षा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2021 12:00 IST

Washim News : १ लाख २६ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना अद्याप मोफत पाठ्यपुस्तक योजनेसाठी पुस्तके उपलब्ध झाली नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम:  शासनाने यंदाच्या शैक्षणिक सत्राला १८ जूनपासून ऑनलाइन पद्धतीने सुरुवात झाली. तथापि, आठवडा उलटला तरी जिल्ह्यातील १ लाख २६ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना अद्याप जिल्ह्यात मोफत पाठ्यपुस्तक योजनेसाठी पुस्तके उपलब्ध झाली नाहीत.शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तक योजनेंतर्गत शासकीय मराठी आणि उर्दू शाळांतील पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाते. साधारणत: शाळेचे सत्र सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी या पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाते. वाशिम जि.प. शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांची मागणी नोंदविली आहे. जिल्ह्यात या योजनेंतर्गत १ लाख २६ हजार ३०१ विद्यार्थ्यांसाठी  ७ लाख ५ हजार ५५० पुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे. तथापि, शैक्षणिक सत्र सुरू होऊन आठवडा उलटला तरी जिल्ह्यात मोफत पाठ्यपुस्तकांचा पुरवठा झाला नसल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. अध्ययन, अध्यापन कसे करणारयंदाच्या शैक्षणिक सत्राला २८ जूनपासून सुरुवात झाली असली तरी शाळांत शिक्षकांना ५० टक्के उपस्थिती ठेवण्याच्या आणि विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने धडे देण्याच्या सूचना आहेत. तथापि, विद्यार्थ्यांकडे अद्याप पाठ्यपुस्तकेच नसल्याने शिक्षक अध्यापन करणार कसे आणि विद्यार्थी ऑनलाइन वर्गात अध्ययन करणार कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासाठी गतवर्षीच्या पुस्तकांचा आधार विद्यार्थ्यांना शोधून अभ्यासासाठी वापरता येणार आहे; परंतु यासाठी जावे कोणाकडे, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. 

यंदाच्या शैक्षणिक सत्रात मोफत पाठ्यपुस्तक वितरण योजनेंतर्गत १ लाख २६ हजार विद्यार्थ्यांसाठी पुस्तकांची मागणी नोंदविण्यात आली आहे; परंतु अद्याप शासनाकडून पुस्तकांचा पुरवठा झाला नाही. पुस्तके प्राप्त झाल्यानंतर कोरोना संसर्गाची खबरदारी घेऊन त्यांचे वितरण कसे करायचे, याबाबत नियोजन केले जाणार आहे. - गजाननराव डाबेराव,प्र. उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक)जि.प. वाशिम

टॅग्स :washimवाशिमStudentविद्यार्थी