वाशिम : दहावी, बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाल्याने पुढील अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी व पालकांची सद्या मोठ्या प्रमाणात धावपळ सुरू आहे. यामुळे जात पडताळणी विभागाच्या कार्यालयावर मंगळवारी तोबा गर्दी झाल्याचे दिसून आले. दरम्यान, जुने अर्ज निकाली काढण्यासोबतच चालू महिन्यात तब्बल १,२५६ अर्ज निकाली काढून संबंधितांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आल्याची माहिती जात पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी एम.जी.वाठ यांनी दिली.नोकरी, निवडणूक यासह विविध स्वरूपातील शालेय अभ्यासक्रमांकरिता जात पडताळणी प्रमाणपत्र अत्यावश्यक ठरत आहे. अशातच सद्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल जाहीर झाल्यामुळे पुढील शैक्षणिक अभ्यासक्रमास प्रवेशाकरिता हा दस्तावेज महत्वाचा ठरत असून तो मिळविण्यासाठी विद्यार्थी व पालकांची मोठी धावपळ सुरू आहे. ही बाब लक्षात घेवून जुने अर्ज निकाली काढण्यासोबतच नव्याने मंजूर झालेली त्रुट्यांविरहित प्रकरणेही प्रथम प्राधान्याने निकाली काढली जात असल्याचे संशोधन अधिकारी वाठ यांनी सांगितले. ज्या प्रकरणांमध्ये त्रुट्या उद्भवल्या, असे ५५० जात पडताळणीचे अर्ज प्रलंबित असून संबंधितांनी सुचविलेल्या त्रुट्या दुर केल्यास सदर अर्जही विनाविलंब निकाली काढले जातील, असेही वाठ यांनी सांगितले.
जात पडताळणीच्या कार्यालयावर तोबा गर्दी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 16:04 IST
वाशिम : दहावी, बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाल्याने पुढील अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी व पालकांची सद्या मोठ्या प्रमाणात धावपळ सुरू आहे.
जात पडताळणीच्या कार्यालयावर तोबा गर्दी!
ठळक मुद्देजात पडताळणी विभागाच्या कार्यालयावर मंगळवारी तोबा गर्दी झाल्याचे दिसून आले.जुने अर्ज निकाली काढण्यासोबतच चालू महिन्यात तब्बल १,२५६ अर्ज निकाली.