शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष्यांसाठी चिमुकल्यांची धडपड; झाडांवर लावले जलपात्र 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 16:25 IST

एस.एम.सी. इंग्लीश स्कूल  येथे  राष्ट्रीय हरित सेनेच्या चिमुकल्यांनी प्राचार्य मिना उबगडे व राष्ट्रीय हरित सेनेचे  शिक्षक अभिजीत मुकूंदराव जोशी यांच्या मार्गदर्शनात पक्षांना रणरणत्या उन्हापासून संरक्षण आणि पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी जलपात्रांची उभारणी करण्यात आली. 

ठळक मुद्दे पक्षी हा निसार्गाचा अतिशय महत्वाचा घटक असुन तो पर्यावरणाचा समतोल सांभाळण्याचा  एक महत्वाचा दुवा आहे. राष्ट्रीय हरित सेना व निसर्ग इकोक्लबच्या माध्यमातुन  शाळेच्या परिसरात जलपात्राची उभारणी केली असुन पक्षांना  दाणे व पाण्याची  व्यवस्था सुध्दा करण्यात आली आहे. २० मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिवस म्हणून संपुर्ण भारत देशात साजरा केला जातो.

वाशिम  : २० मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिवस म्हणून संपुर्ण भारत देशात साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधुन  स्थानिक  एस.एम.सी. इंग्लीश स्कूल  येथे  राष्ट्रीय हरित सेनेच्या चिमुकल्यांनी प्राचार्य मिना उबगडे व राष्ट्रीय हरित सेनेचे  शिक्षक अभिजीत मुकूंदराव जोशी यांच्या मार्गदर्शनात पक्षांना रणरणत्या उन्हापासून संरक्षण आणि पर्यावरणाचा ऱ्हास  थांबविण्यासाठी जलपात्रांची उभारणी करण्यात आली.  सध्या पृथ्वी  वरील वाढते तापमान  झपाट्याने होत असलेले आधुनिकीकरण , यांत्रीकीकरण आणि निसर्गाचा दुष्परिणाम  यामुळे गंभीर परिस्थिती निमाृण होत आहे.  सोबतच सध्याच्या रासायनिक किटकनाशकांचा व खतांचा अतिवापर  यामुळे पक्षांची संखया णपाट्याने कमी होत आहे. त्यातच  मोबाईल टॉवर इंटरनेटच्या अतिवापरामुळे आणि त्यातुन निघणाºया लहरींचा फटका  पक्षांना बसत आहे. प्रत्यक्षात दिसणारा पक्षी चिमणी आता फक्त् लहान  मुलांना चित्रातच दिसण्याची वेळ आली आहे. पक्षी हा निसार्गाचा अतिशय महत्वाचा घटक असुन तो पर्यावरणाचा समतोल सांभाळण्याचा  एक महत्वाचा दुवा आहे. या सर्व बाबी  लक्षात घेवुन राष्ट्रीय हरित सेना व निसर्ग इकोक्लबच्या माध्यमातुन  शाळेच्या परिसरात जलपात्राची उभारणी केली असुन पक्षांना  दाणे व पाण्याची  व्यवस्था सुध्दा करण्यात आली आहे.  तसेच नागरिकांनी आपल्या धराच्या छतावर व आजुबाजुच्या परिसरात या उन्हाळ्यात पाण्याचे छोटेसे भांडे ठेवावे व पक्षांना दाणे टाकावेत यामुळे पक्षांच्या कमी होणाºया संख्येला आळा बसणार आहे. तसेच त्यांचे अस्तित्व टिकविण्यासाठी आपला हातभार लावावा असे आवाहन शाळेच्या प्राचार्य मिना उबगडे व राष्ट्रीय हरित सेनेचे शिक्षक अभिजीत मुकूंदराव  जोशी आणि हरित सेनेचे चिमुकले दिशा  अग्रवाल, विदुला वाघ, सानिका गोरे, खुशी चौधरी, दिशा दायमा, अनिकेत चव्हाण, रिझा हुसेन, धनंजय काकडे, विशाल वानखेडे, पार्थ वानखेडे, श्रेयश  कुळकर्णी, अनुष्का जोशी, वेदश्री देशमाने, सुमित वाकुडकर, नेहा वानखेडे, करण तिवारी, दुर्गीश घनोकार यांनी केले आहे.

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळा