शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गाच्या माध्यमातून जलस्त्रोतांच्या पुनरुज्जीवनासाठी धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 14:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क  वाशिम : जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या आधारे जलस्त्रोत पुनरुज्जीवीत व्हावेत यासाठी जलहक्क चळवळीचे कार्यकर्ते सचिन कुळकर्णी यांची ...

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या आधारे जलस्त्रोत पुनरुज्जीवीत व्हावेत यासाठी जलहक्क चळवळीचे कार्यकर्ते सचिन कुळकर्णी यांची धडपड सुरू आहे. याबाबत त्यांनी केंद्रीय जलसंधारण व रस्ते विकासमंत्री नितिन गडकरी यांना पत्र पाठवून जलस्त्रोताचे खोदकाम करून महामार्गाच्या कामासाठी गौण खनिज वापरण्याची मागणी केली आहे. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना पाठविलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की, वाशिम जिल्ह्यात सातत्याने पाण्याची समस्या उद्भवत असून, भुजल पातळी अत्यंत खालावली आहे. जिल्ह्यात सरासरी पर्जन्यमान ८०० मी. मी. आहे. जिल्ह्यात १० मोठ्या नद्या वाहतात, तसेच अनेक पुरातन व नवीन तलावही आहेत. वर्षानुवर्षे या जलस्त्रोतातील गाळ उपसा झाला नसल्याने पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे. आता जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गांची कामे प्रगतीपथावर असून, या कामांच्या आधारे जलस्त्रोतांचे पुनरुज्जीवन करण्याची मागणी यापूर्वीही आपण केली मंत्री महोदयांकडे केली होती. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या कामांची जलस्त्रोत पुनरुज्जीवनासाठी सांगड घातल्यास जिल्ह्यात ८६,५६,९१८ ब्रास गौण खनिज उपलब्ध होते. त्यातून जवळपास १६.५१८ स.घ.मी. एवढा जलसाठा निर्माण होतो. शासन निर्णयानुसार १ स.घ.मी. जलसाठा निर्माण करण्यासाठी १ लाख ४४ हजार ०४७ रुपये खर्च येतो. त्यामुळे जिल्ह्यातील कामांचा आधार घेतला, तर २३७.८५ कोटी रुपयांची बचत अपेक्षीत आहे. त्यामुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गांसाठी गौण खनिजाची पूर्तता करताना जलस्त्रोतांचे खोलीकरण व पुनरुज्जीवन करावे.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणीhighwayमहामार्ग