शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्याचे चित्र बघून मोदींचा चेहरा काळा पडलाय, शाह यांची दाढी जळाली; शिंदेंवरही राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
2
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रस्तावक होणारे ते चार लोक कोण? राम मंदिरासोबत आहे कनेक्शन!
3
सत्तेच्या हॅटट्रिकसाठी भाजपाची नजर सायलेंट वोटरवर; २०२४ निवडणुकीत करणार करिष्मा?
4
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच दाखल होणार मान्सून; महाराष्टात कधी बरसणार?
5
पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा दाखल केला उमेदवारी अर्ज, शाह-राजनाथ यांच्यासह हे दिग्गज होते उपस्थित
6
Haldiram's वर ब्लॅकस्टोनसह 'या' दिग्गज कंपन्यांची नजर, हजारो कोटींची होणार डील
7
IPL 2024 : रिंकू सिंगचा अतिउत्साही चाहता; चेंडू अशा ठिकाणी लपवला की पोलिसही गोंधळले
8
कोरेगाव भीमा प्रकरणः गौतम नवलखा यांना जामीन, प्रक्षोभक भाषणाच्या आरोपावरून होते नजरकैदेत
9
"दिल्लीच्या 'त्या' बैठकीत मोदींनी ठाकरेंना पुन्हा एकत्र येण्याची ऑफर दिली होती"
10
...म्हणून शरद पवार आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील, मोदींनी पुन्हा एकदा डिवचले
11
T20 World Cup 2024 साठी बांगलादेशचा तगडा संघ; २२ वर्षीय खेळाडूला संधी!
12
होर्डिंगच्या पायाभरणीतील 'ती' एक चूक अन् १४ कुटुंबांवर कोसळला दुःखाचा डोंगर!
13
सोनं -चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! दुसऱ्या दिवशीही दर कोसळले; वाचा आजचे दर
14
Fact Check: PM मोदींच्या विजयावर शंका घेणारा नितीश कुमारांचा व्हायरल व्हिडिओ जुना; पाहा, सत्य
15
4 जूनला किती वेळ राहिलाय, थोडा धीर...; पृथ्वीराज चव्हाणांच्या अंदाजावर भुजबळांचा सल्ला
16
'तू आई होऊ शकत नाहीस'; डॉक्टरांनी रुपाली गांगुलीला दिला होता IVF चा सल्ला, पण..
17
पावसानं गुजरातला 'बुडवलं', पण फ्रँचायझीकडून चाहत्यांना 'खुशखबर', केली मोठी घोषणा!
18
हायप्रोफाईल चोर, हवेतल्या हवेत मारायचा मौल्यवान दागिन्यांवर डल्ला, वर्षभरात २०० विमानात केली चोरी 
19
Fact Check : हैदराबादमध्ये मोदींनी AIMIM ला पाठिंबा दिल्याच्या Video दिशाभूल करणारा; जाणून घ्या 'सत्य'
20
"लोक मदतीसाठी ओरडत होते पण आम्ही काहीच करु शकलो नाही"; होर्डिंग कोसळलं, 14 जणांचा मृत्यू

कोविडमुळे उपासमार; वारांगणांना  प्रशासनाने दिला आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 11:10 AM

Administration gave support to prostitutes अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या बँक खात्यात ११.७० लाखांची रक्कम ‘डीबीटी’व्दारे जमा करण्यात आली.

- सुनील काकडेवाशिम : देहविक्रयाचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिला व त्यांच्यावर विसंबून असलेल्या बालकांची कोविड-१९ मुळे उपासमार सुरू होती. दरम्यान, २६ नोव्हेंबर २०२० रोजी पारित शासननिर्णयास अधीन राहून जिल्ह्यातील ७२ महिला व १२ बालकांना कोरडे अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या बँक खात्यात ११.७० लाखांची रक्कम ‘डीबीटी’व्दारे जमा करण्यात आली. यामुळे संबंधितांना मोठा दिलासा मिळाला आहे.सर्वोच्च न्यायालयात दाखल अपील क्र. १३५/२०१० (बुधादेव करमास्कर विरुद्ध स्टेट ऑफ वेस्ट बेंगॉल व इतर) निकाली काढताना देहविक्रयाचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांना कोविड-१९ च्या प्रादुर्भाव काळात आर्थिक साहाय्य देण्यासंबंधी राज्य शासनाला निर्देश प्राप्त झाले होते. त्यानुषंगाने २६ नोव्हेंबर २०२० रोजी शासननिर्णय पारित करून राज्यभरातील ३० हजार ९०१ महिला आणि त्यांच्यावर विसंबून असलेल्या ६ हजार ४५१ बालकांना अर्थसाहाय्य करण्यासाठी ५१ कोटी १८ लाख ९७ हजार ५०० रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला होता. त्यात वाशिम जिल्ह्याच्या वाट्याला ११ लाख ७० हजार रुपयांचा निधी आला होता. दरम्यान, अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमांतर्गत सुटका करण्यात आलेल्या पीडिता आणि देहविक्रयाचा व्यवसाय करून आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांना कोरडे अन्नधान्य व प्रतिमाह प्रतिमहिला ५ हजार रुपये तसेच ज्या महिलांची मुले शाळेत जातात, त्यांना प्रतिमाह २५०० रुपये अतिरिक्त रक्कम कोणत्याही ओळखपत्राचा आग्रह न धरता जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या मान्यतेने बँक खात्यात जमा करण्यात आली. यामुळे अडचणीच्या काळात संबंधित महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

२६ नोव्हेंबर २०२० च्या शासननिर्णयानुसार जिल्ह्यात देहविक्रयाचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिला व त्यांच्यावर विसंबून असलेल्या बालकांच्या खात्यात ११.७० लाखांची रक्कम जमा करण्यात आली आहे. याशिवाय संबंधितांना कोरडे अन्नधान्यही वितरित करण्यात आले आहे.- सुभाष राठोडजिल्हा महिला व बालविकास अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमWashim Collector officeवाशिम जिल्हाधिकारी कार्यालय