शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात दीड महिन्यानंतर एसटी धावली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 10:27 IST

पहिल्या दिवशी मोजक्याच प्रवाशांनी जिल्ह्यांतर्गत बसमधून प्रवास केला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ग्रीन झोनमध्ये समावेश झाल्याने, जिल्ह्यात २१ मार्चपासून ठप्प असलेली महामंडळाची बससेवा ८ मे पासून पूर्ववत झाली. दरम्यान पहिल्या दिवशी मोजक्याच प्रवाशांनी जिल्ह्यांतर्गत बसमधून प्रवास केला.कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य शासनाने २१ मार्चपासून लालपरीचा चक्काजाम केला. त्यामुळे २१ मार्चपासून राज्यभरातील बसगाड्या आहे तिथेच थांबविण्यात आल्या आहेत. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील कारंजा, मंगरूळपीर, वाशिम, रिसोड या चार आगारांचा समावेश होता. कोरोना संक्रमणामुळे दररोजच्या फेऱ्या थांबल्याने जिल्ह्यातील बसेसचा प्रवासही रद्द झाला झाला होता. त्यामुळे जिल्ह्यात जवळपास पाच ते सात कोटींचा फटका चारही आगारांना बसला आहे. दरम्यान, वाशिम जिल्हा हा ग्रीन झोनमध्ये असल्याने संचारबंदी व लॉकडाउनमधून बºयाच अंशी शिथिलता मिळाल्याने बाजारपेठ पूर्ववत होत आहे. याप्रमाणेच जिल्ह्यांतर्गत बस सेवेलाही काही अटी व शर्तीच्या अधिन राहून परवानगी देण्यात आली. ५० टक्के आगार तसेच बसेसमध्ये ५० टक्के प्रवाशी या तत्वावर जिल्ह्यांतर्गत ८ मे पासून बससेवा सुरूवात झाली. जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये ४७ दिवसानंतर ८ मे रोजी रिसोड आगार सुरू झाला. शुक्रवारी सकाळी नऊ वाजता रिसोड येथील आगारात काही बसेस उभ्या होत्या. पहिली बस रिसोड ते मालेगाव व रिसोड ते वाशिम या मार्गे धावली. यामध्ये वाहक व चालक म्हणून नारायण पवार, पांडुरंग डाखोरे मोतीराम भिसडे, दिलीप देशमुख यांनी कर्तव्य दिले. दरम्यान, रिसोड आगारातून शुक्रवारी दिवसभरात केवळ ११ प्रवाशांनी बसमधून प्रवास केल्याची माहिती आगार व्यवस्थापक अनिरूद्ध मेहत्रे यांनी दिली. शिरपूर येथे रिसोड ते मालेगाव अशा दोन बसफेºया धावल्या. मात्र, या बसमध्ये शिरपूर येथून एकही प्रवासी चढला नाही किंवा बसमधून उतरला नाही. शिरपूर येथील बस डेपोमध्ये एकही प्रवाशी नव्हता. रिसोड येथील आगारातही चार ते पाच प्रवाशी दुपारच्या सुमारास होते. वाशिम आगारातही हीच परिस्थिती दिसून आली. रिसोड आगारात ८ मे पासून रिसोड ते वाशिम व रिसोड ते मालेगाव अशी बससेवा सुरू झाली. दक्षता घेण्याच्या सूचना चालक व वाहकांना दिल्या आहेत. प्रवाशांनीदेखील आवश्यक ती खबरदारी घ्यावी.-अनिरूद्ध मेहत्रे,आगार प्रमुख रिसोड

टॅग्स :washimवाशिमstate transportएसटी