शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सुसाट वेगातील वाहनांमुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 15:51 IST

अपघातांची भिती कायमची लागून राहत असल्यने विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात सापडत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शहरात बहुतांश शाळा मुख्य रस्त्याला लागूनच आहेत. शाळा भरताना आणि सुटल्यानंतर सुसाट वेगाने धावणाºया वाहनांच्या गराड्यातूनच विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडण्याशिवाय पर्याय नाही. यामुळे मात्र अपघातांची भिती कायमची लागून राहत असल्यने विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात सापडत आहे. असे असताना शाळा प्रशासन आणि शहर वाहतूक विभागाचे या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष होत आहे. जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या वाशिम शहरात राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाला अगदी लागूनच आहे. या चौकातून चारही बाजूंनी दैनंदिन सुसाट वेगाने वाहने धावत असतात. श्री शिवाजी विद्यालय आंबेडकर चौक ते पाटणी चौक या शहरातील मुख्य मार्गावर आहे. श्री बाकलीवाल विद्यालय हे रिसोड नाका ते गोपाल टॉकीज मार्गावर; तर एस.एम.सी. इंग्लिश स्कुल वाशिम-रिसोड मार्गाच्या कडेला वसलेले आहे. राजस्थान आर्य महाविद्यालय हे अकोला नाका ते काटा या रस्त्यावर आहे. नमूद सर्वच मार्ग आणि रस्त्यांवरून दैनंदिन लहान-सहान वाहनांसह जडवाहतूकही होते. शाळा भरताना आणि सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना जीव मुठीतच ठेवावा लागत असल्याची एकंदरित स्थिती निर्माण झाली आहे. असे असताना एकाही शाळेनजिक आतापर्यंत वाहतूक विभागाने एखादा कर्मचारी नियुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला नाही. वाशिम शहरातील प्रत्येक शाळेच्या प्रशासनानेही याप्रती गाफील भूमिका अंगीकारली असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कुठल्याच ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. यामुळे या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांमधून तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.  वाशिम शहरातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांशी चर्चा करण्यासह लवकरच प्रत्येक शाळेजवळ सकाळी आणि सायंकाळी वाहतूक पोलिसाची नियुक्ती करण्यासाठी पुढाकार घेतला जाईल. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसोबतच चिडिमारीसारखे प्रकार घडत असल्यास त्यावरही नियंत्रण ठेवण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील.- राजू वाटाणेनिरीक्षक, शहर वाहतूक विभाग, वाशिम शहरातील रस्त्यांच्या कडेला वसलेल्या शाळांनजिक सकाळ आणि सायंकाळ अशा दोन्ही वेळी वाहनांचे नियमन करण्यासाठी वाहतूक विभागाचा कर्मचारी नियुक्त असणे गरजेचे आहे. यासह शाळा प्रशासनानेही विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष पुरवायला हवे. यासंदर्भात नगर परिषदेकडून संबंधितांना तशा सूचना दिल्या जातील. - अशोक हेडानगराध्यक्ष, नगर परिषद, वाशिम

टॅग्स :washimवाशिमStudentविद्यार्थीTrafficवाहतूक कोंडी