शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी उद्यापासून विशेष मोहिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 16:19 IST

Washim News जिल्ह्यात १ ते १० मार्च या दरम्यान शोध मोहिम राबविण्यात येणार आहे.

वाशिम : शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्यात १ ते १० मार्च या दरम्यान शोध मोहिम राबविण्यात येणार आहे. या शैक्षणिक उपक्रमात महसूल, ग्रामविकास, नगरविकास यासह अन्य शासकीय विभागातील अधिकाºयांचे सहकार्य घेतले जाणार आहे.बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिकार अधिनियम २००९ नुसार ६ ते १४ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकास शाळेच्या पटावर नोंदणी व्हावी, बालकांनी नियमित शाळेत येणे आणि त्याला दर्जेदार शिक्षण मिळणे हा हक्क प्राप्त झाला आहे. ऊसतोडणी, वीटभट्टी, दगडखाण, कोळसाखाणी, शेतमजूरी, बांधकाम व्यवसाय क्षेत्रातील कामांसाठी पाल्यासह कुटुंबे स्थलांतरण करीत असल्याने  ६ ते १४ वयोगटातील अनेक बालके शिक्षणापासून वंचित राहतात. अशा स्थलांतरीत, शाळाबाह्य बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शालेय शिक्षण विभागातर्फे १ ते १० मार्च २०२१ या कालावधीत विशेष शोध मोहिम राबविण्यात येणार आहे. १०० टक्के बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी एकत्रितपणे योग्य नियोजन करून कृती करणे शालेय शिक्षण विभागाला अपेक्षीत आहे. शाळाबाह्य, स्थलांतरीत व शाळेत अनियमित असलेल्या बालकांची शोध मोहिम राबविण्याकामी महसूल, ग्रामविकास, नगरविकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, महिला व बालविकास, एकात्मिक बालविकास योजना, कामगार व आदिवासी विकास, अल्पसंख्याक विकास, सार्वजनिक आरोग्य आणि गृह विभागातील अधिकाºयांचे सहकार्य घेतले जाणार आहे. ३ ते ६ वयोगटातील जी बालके एकात्मिक बालविकास योजनेचा लाभ घेत नाहीत तसेच खासगी बालवाडी, इंग्रजी माध्यमांचे ज्युनिअर केजी, सिनिअर केजीमध्ये जात नाहीत अशा बालकांचादेखील शोध घेण्यात येणार आहे. यासाठी जिल्हास्तर, तालुकास्तरावर नोडल अधिकाºयांच्या नियुक्त्यादेखील करण्यात आल्या.

टॅग्स :washimवाशिमEducation Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळा