शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सोयाबीनने ओलांडला साडेपाच हजारांचा टप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 17:00 IST

Soybeans rates crossed the five and a half thousand mark जिल्ह्यातील बाजारात सोयाबीनचे दर साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: गेल्या काही महिन्यांपासून सोयाबीनच्या दरातील तेजी कायम आहे. शासनाने सोयाबीनला जेमतेम ३,८८० रुपये प्रती क्विंटलचे दर घोषित केले असताना जिल्ह्यातील बाजारात सोयाबीनचे दर साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले आहेत. त्यात रिसोड आणि मंगरुळपीर बाजार समितीत सोयाबीनला प्रती क्विंटल साडे पाच हजारांच्यावर दर मिळत आहेत. त्यामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.गतवर्षी जिल्ह्यात सोयाबीन काढणीवर असतानाच अवकाळी पावसाचा या पिकाला फटका बसल्याने हजारो शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. उत्पादनातही घट आली. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण होते. त्यात सुरुवातीच्या काळात बाजार समित्यांत अल्पदराने सोयाबीनची खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण पसरले. दरम्यान, ब्राझील, अमेरिकेसारख्या सोयाबीन उत्पादक देशातही या शेतमालाच्या उत्पादनात प्रचंड घट आली. त्यामुळे सोयाबीनच्या मागणीत आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढ झाली. चीनकडूनही सोयाबीनची मागणी होत असल्याने देशातील बाजारात सोयाबीनच्या दरात तेजी येऊ लागली. याचा परिणाम विदभार्तील बाजारात दिसून येऊ लागला. त्यात वाशिम जिल्ह्यातील बाजारातही सोयाबीनच्या दराने उच्चांक गाठला असून, बाजारात सोयाबीनचे दर ५ हजार ५०० रुपयापर्यंत पोहोचले आहेत. मंगरुळपीर आणि रिसोड येथील बाजार समितीत गेल्या पाच दिवसांपासून सोयाबीनला प्रती क्विंटल साडे पाच हजारांपेक्षा अधिक दर मिळत आहेत.

रिसोड बाजार समितीत सर्वाधिक दरवाशिम जिल्ह्यातील रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनचे दर साडेपाच हजार रुपयांहून अधिक झाले आहेत. गुरुवारी बाजार समितीकडून प्राप्त माहितीनुसार या ठिकाणी कमाल ५,६०० रुपये प्रति क्विंटल, तर मंगरुळपीर बाजार समितीत कमाल ५,५४० रुपये प्रती क्विंटल दराने सोयाबीनची खरेदी झाली. जिल्ह्यातील इतरही बाजार समित्यांत सोयाबीनचे दर साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपासच होते.

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्रMarket committee washimबाजार समिती वाशिम