शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

सोयाबीनची आवक वाढली; दरात घसरण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 3:19 PM

दर्जा खालावलेल्या सोयाबीनची खरेदी २४०० रुपये ते २७०० रुपये प्रति क्विंटल दराने होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात यंदाच्या हंगामातील सोयाबीनची आवक बाजारात वाढू लागली आहे; परंतु नवे सोयाबीन बाजारात दाखल झाल्यानंतर १५ दिवसांपूर्वीच ३८०० ते ४००० रुपयांपर्यत पोहोचलेले सोयाबीनचे दर आता थेट अधिकाधिक ३४०० ते ३५०० रुपये प्रति क्विंटलवर घसरले आहेत. शासनाने सोयाबीनला ३७१० रुपये प्रति क्विंटल हमीदर घोषीत केले आहेत, हे विशेष.वाशिम जिल्ह्यात यंदा २ लाख ९० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात सोयाबीन पिकाची पेरणी झाली होती. पावसाच्या अनियमिततेमुळे या पिकाला काही प्रमाणात फटका बसला. कधी अतिवृष्टी, कधी पावसाचा खंड आदि कारणांसह परतीच्या पावसामुळे या पिकाचे नुकसान झाल्याने उत्पादनात मोठी घट आली, तसेच दर्जाही खालावला. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. बहुतांश शेतकऱ्यांना सोयाबीनचे एकरी ४ क्विंटलही उत्पादन झाले नाही. आता जिल्ह्यात सोयाबीनची ८० टक्के काढणी उरकली असून, दिवाळीच्या सणासह रब्बी हंगामाच्या तयारीसाठी शेतकरी पैसा जुळविण्याच्या उद्देशाने सोयाबीनची विक्री करीत आहेत. तथापि, बाजार समित्यांत गगत १० ते १५ दिवसांपूर्वीच सोयाबीनची खरेदी अधिकाधिक ३८०० रुपये ते ४००० रुपये प्रति क्विंटलने होत असताना आता नव्या सोयाबीनचे दर मात्र ३५०० रुपये प्रति क्विंटलच्या खाली घसरत आहेत. शासनाने सोयाबीनला ३७१० रुपये प्रति क्विंटलचे दर घोषीत केले असताना बाजारात मात्र तेवढेही दर शेतकºयांना मिळत नसल्याचे दिसत आहे. त्यातच दर्जा खालावलेल्या सोयाबीनची खरेदी २४०० रुपये ते २७०० रुपये प्रति क्विंटल दराने होत आहे. त्यामुळे या पिकावर पेरणीपासून ते निंदण, खुरपण, डवरणी, खते, कीटकनाशकासाठी केलेला खर्चही अनेक शेतकºयांना वसुल होत नसल्याचे दिसते. मुग, उडिदाच्या दरात तेजीजिल्ह्यातील बाजार समित्यांत सोयाबीनच्या दरात घसरण होत असल्याने शेतकरी निराश आहेत, तर उडिद आणि मुगाच्या दरात मात्र तेजी असल्याने मुग, उडिदाचे उत्पादन करणाºया शेतकºयांना थोडा फार दिलासा मिळाला आहे. यंदा मान्सूनला विलंब झाल्याने वाशिम जिल्ह्यात मुग आणि उडिद या पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटले आहे. दोन्ही पिकांची मिळून सरासरी ३० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी अपेक्षीत असताना यंदा या पिकांची १६५०० हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झाली होती. त्यातच पावसामुळे या पिकांचे मोठे नुकसानही झाले होते.

टॅग्स :washimवाशिमMarket committee washimबाजार समिती वाशिमFarmerशेतकरी