शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

पेरलेले बियाणे उगवलेच नाही ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 13:05 IST

इंझोरी शिवारात महाबीजकडून घेतलेले सोयाबीन बियाणे उगवलेच नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्दे शेतकºयांनी महाबीजकडून घेतलेल्या सोयाबीन बियाण्यांची पेरणी केली. आंतरपिक म्हणून तुरीची पेरणीही केली.तुरीचे बियाणे उगवले; परंतु सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कइंझोरी (वाशिम) : जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाल्यानंतर शेतकरी उल्हासित झाला असतानाच त्याच्यावरील संकटाच्या मालिकेलाही सुरुवात झाली आहे. इंझोरी शिवारात महाबीजकडून घेतलेले सोयाबीन बियाणे उगवलेच नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे या शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.यंदा मान्सून लांबल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. २२ जुनपर्यंतही मान्सूनचा पत्ताच नव्हता. त्यामुळे खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. वाशिम जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याची स्थिती सारखीच होती. त्यात मानोरा तालुक्याचाही समावेश होता. खरीपासाठी मशागत करून जमीन तयार केली असतानाही पावसाचा मागमुस नसल्याने शेतकºयांचे डोळे आकाशाकडे लागले होते. अखेर २२ जुनपासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर शेतकºयांनी खरीपाच्या पेरणीला वेगही दिला. यात मानोरा तालुक्यातील इंझोरी शिवारातील शेतकºयांनी महाबीजकडून घेतलेल्या सोयाबीन बियाण्यांची पेरणी केली. आंतरपिक म्हणून तुरीची पेरणीही केली. त्यातील तुरीचे बियाणे उगवले; परंतु सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही. जवळपास ८ शेतकºयांना या प्रकाराचा फटका बसला आहे. आता या संदर्भात शेतकºयांनी तालुका कृषी अधिकारी आणि महाबीजकडे तक्रार करून शेताची पाहणी करण्यासह नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.  शेतकºयांकडून जमिनीतील बियाण्यांची पाहणी इंझोरी शिवारातील बहुतांश शेतकºयांनी महाबीजकडून घेतलेले सोयाबीन बियाणे पेरले आहे. आता ज्या शेतकºयांच्या शेतात सोयाबीन बियाणे उगवलेच नाही. ते शेतकरी शेतात पेरणीच्या सºया उकरून बियाण्यांचा शोध घेऊन नेमके काय घडले ते माहिती करण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसत आहेत. 

  शेतकºयांनी पेरलेले सोयाबीन बियाणे उगवले नसल्याची तक्रार अद्याप आपल्याकडे आलेली नाही. तथापि, इंझोरी शिवारात असा प्रकार घडला असेल, तर प्रत्यक्ष शेतांना भेटी देऊन पाहणी करू आणि वस्तूस्थितीनुसार शेतकºयांना नुकसान भरपाई किंवा मोबदला देण्याचा निर्णय घेऊ.-डॉ. प्रशांत घावडे

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी