शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

पेरलेले बियाणे उगवलेच नाही; शेतकऱ्यांसमोर आर्थिक पेच  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 16:24 IST

जिल्ह्यात एकूण ४ लाख ६ हजार २३४ हेक्टर खरीप क्षेत्रापैकी २२ जूनपर्यंत ८० टक्के पेरणी उरकली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: खरीप हंगामात पेरलेले सोयाबीन उगवले नसल्याच्या शेतकºयांच्या तक्रारी कृषी विभागाला प्राप्त होत असून, त्याअनुषंगाने सर्वेक्षण केले जात आहे. २२ जूनपर्यंत जवळपास १०० तक्रारी प्राप्त झाल्या. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यात पावसाचे लवकर आगमन झाले. १० ते १६ जूनदरम्यान बºयापैकी पाऊस झाल्याने ८० टक्क्यापेक्षा अधिक शेतकºयांनी पेरण्या आटोपल्या. दरम्यान, जेथे जमिनीत चार इंच ओलावा नाही किंवा ८० मीमी पेक्षा कमी पाऊस झाला तेथे शेतकºयांनी पेरण्या करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले होते. ज्या महसूल मंडळात ८० मीमी पेक्षा कमी पाऊस झाला तेथेही अनेक शेतकºयांनी पेरण्या आटोपल्या आहेत. जिल्ह्यात एकूण ४ लाख ६ हजार २३४ हेक्टर खरीप क्षेत्रापैकी २२ जूनपर्यंत ८० टक्के पेरणी उरकली आहे. पेरणीनंतर ८, ९ दिवसांपासून पाऊस नाही. त्यामुळे पेरलेले बियाणे उगवले नसल्याचे प्रकार समोर येत आहेत. घरगुती बियाणे, उत्पादक कंपन्यांचे बियाणे तसेच महाबिजचेही बियाणे उगवले नसल्याच्या जवळपास १०० शेतकºयांच्या तक्रारी तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीच्या कृषी अधिकाºयांमार्फत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाºयांकडे प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारीच्या अनुषंगाने उपविभागीय कृषी अधिकारी, महाबिजचे जिल्हा व्यवस्थापक, तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी, कृषी मंडळ अधिकारी, कृषी सहायक आदींचा समावेश असलेल्या चमूच्यावतीने घटनास्थळी भेट देऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. सर्वेक्षणाअंती वरिष्ठांकडे सविस्तर अहवाल पाठविला जाणार आहे. शेतात पेरलेले बियाणे उगवले नसल्यासंदर्भात तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांच्यामार्फत शेतकºयांच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. आतापर्यंत जवळपास १०० शेतकºयांच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यानुसार कृषी विभागातर्फे सर्वेक्षण केले जात आहे.- एस.एम. तोटावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी