शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

समाजकल्याणचा लाचखोर लिपीक ‘एसीबी’च्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 14:42 IST

येथील समाजकल्याण विभागाच्या कनिष्ठ लिपीकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १ डिसेंबर रोजी रंगेहात जेरबंद केले. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : इयत्ता बारावीत शिकणाºया एका विद्यार्थ्याकडून ‘स्वाधार’ योजनेच्या यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी ३ हजारांची लाच मागणारा व त्यापोटी १५०० रुपये लाच स्विकारणाºया येथील समाजकल्याण विभागाच्या कनिष्ठ लिपीकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १ डिसेंबर रोजी रंगेहात जेरबंद केले. प्राप्त माहितीनुसार, या प्रकरणातील तक्रारदार विद्यार्थ्याने ३० नोव्हेंबर रोजी लाचलुचपत विभागाकडे दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले, की शासनामार्फत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता राबविण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ पाहिजेत असल्यास तसेच यादीत नाव समाविष्ट करायचे असल्यास वाशिम येथील समाजकल्याण विभागाचा कनिष्ठ लिपीक पवन बाबाराव म्हस्के (वय २७ वर्षे) याने ३ हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती १५०० रुपये देण्याचे ठरले. अशा आशयाच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १ डिसेंबर रोजी सापळा रचून कनिष्ठ लिपीक म्हस्के यास तक्रारदाराकडून १५०० रुपये स्विकारताना रंगेहात जेरबंद केले. सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक धिवरे अतिरिक्त अधिक्षक डोंगरदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधिक्षक राहुल गांगुर्डे ,सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील, नंदकिशोर परळकर, पोलिस हवालदार बेलोकर, पोलिस नायक विनोद अवगळे यांनी केली.

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारीAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग