शहरं
Join us  
Trending Stories
1
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
2
१३ चेंडूंत चोपल्या ६४ धावा! 'Virat' पराक्रम करताना चौकार-षटकारांचा पाऊस, थोडक्यात हुकले शतक
3
Air India च्या कर्मचाऱ्यांचा संप मागे; हकालपट्टी झालेल्या 25 कर्मचाऱ्यांना कामावर परत घेणार...
4
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
5
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
6
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
7
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
8
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
9
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
10
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
11
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
12
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
13
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
14
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
15
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
16
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
17
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या
18
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 
19
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
20
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली

रस्त्यांची कामे संथगतिने; धुळीने माखले वाशिम शहर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2019 3:09 PM

वाशिम : नगरपरिषदेच्यावतिने शहर विकासांची कामे जोमात सुरु आहेत. यामुळे नागरिकांना सोयीचे होणार असले तरी संथगतिने सुरु असलेल्या कामाचा त्रास शहरवासियांसह वाहनधारकांना सहन करावा लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : नगरपरिषदेच्यावतिने शहर विकासांची कामे जोमात सुरु आहेत. यामुळे नागरिकांना सोयीचे होणार असले तरी संथगतिने सुरु असलेल्या कामाचा त्रास शहरवासियांसह वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. शहरातील सुरु असलेले रस्ते खोदून ठेवल्याने व अनेक रस्त्यांची कामे बंद पडल्याने धुळीने नागरिक त्रस्त झाले आहेत. याकडे संबधितांनी लक्ष देवून कामास गती देणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रीया नागरिकांत उमटत आहेत.वाशिम शहरातील जवळपास सर्वच रस्त्यांचे कामे होत असल्याने शहरातील रस्त्याची समस्या मिटणार आहे. काही भागातील रस्त्यांची कामे पूर्ण झाल्याने त्या भागातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. परंतु शहरातील मुख्य रस्त्यावरील काही रस्त्यांची मोजमापे झाली असून खोदकामेही करुन ठेवण्यात आली आहेत.परंतु प्रत्यक्षात कामास सुरुवात न झाल्याने या रस्त्यावर असलेल्या प्रतिष्ठान मालकांना, रहिवाश्यांना याचा मोठया प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. वाशिम शहरातील सिंधी कॉलनी ते अकोला नाका रस्त्याचे मोजमाप होवून रस्ता कामास सुरुवात करण्यात आली होती. रस्त्यावरील झाडे तोडून बराच अवधी झाला. परंतु प्रत्यक्षात कामास सुरुवात झाली नसल्याने सर्वत्र धूळ उडत असल्याने त्वचा रोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबधित अधिकारी यांनी याकडे लक्ष देवून या कामांना गती देणे गरजेचे आहे. 

रस्त्याची मोठया प्रमाणात असलेली कामे व मजबुतीकरणाकडे दिल्या जात असलेले विशेष लक्ष यामुळे रस्त्याचे कामे होण्यास वेळ लागत आहे. परंतु सदर रस्ते तयार झाल्यानंतर ते मजबुत व टिकाऊ राहणार आहेत. यासाठी सुरु असलेल्या कामांची पाहणी वेळोवेळी केली जात आहे. कामे वेळेत व मजबुतीसाठी प्रयत्न केल्या जात आहेत.- राजेश घुगरे बांधकाम अभियंता, नगर परिषद वाशिम

टॅग्स :washimवाशिमroad transportरस्ते वाहतूक