शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम तालुक्यात सहा शाळा शंभर नंबरी

By admin | Updated: June 17, 2014 23:48 IST

वाशिम तालुक्यातील एकुण ४४८६ विद्यार्थ्यांपैकी ३९४५ विद्यार्थी उर्त्तीर्ण झाले.

वाशिम : मार्च महिण्यात घेण्यात आलेल्या दहावीचा निकाल आज १७ जुन रोजी ऑनलाईन पध्दतीने जाहीर करण्यात आला. या निकालामध्ये वाशिम तालुक्यातील एकुण ४४८६ विद्यार्थ्यांपैकी ३९४५ विद्यार्थी उर्त्तीर्ण झाले. तालुक्यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ८८.३३ टक्के एवढी असुन तालुक्यातील सहा शाळांनी आपली १00 टक्के निकालाची परंपरा यंदाही कायम ठेवली. हे उल्लेखनीय. वाशिम तालुक्यातील १00 टक्के निकाल देणार्‍या शाळांमध्ये श्रीमती मुलीबाई चरखा इंग्लीश स्कुल वाशिम, यशवंतराव चव्हाण सैनिक शाळा सुपखेला, शांतीनिकेतन इंग्लीश स्कुल वाशिम, माऊंट कारमेल इंग्लीश स्कुल वाशिम, म. आझाद उदरु हायस्कुल वाशिम व हॅपी फेसेस कॉन्व्हेंट स्कुल वाशिम या सहा शाळांचा समावेश आहे. तालुक्यातील ईतर शाळांचा निकाल पुढीलप्रमाणे आहे. बाकलीवाल विद्यालय वाशिम ९0.४७ टक्के, राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा वाशिम ९४.२८ टक्के, नगर परिषद महात्मा गांधी विद्यालय वाशिम ६0.४८ टक्के, श्री शिवाजी हायस्कुल वाशिम ७९.२८ टक्के, जिल्हा परिषद हायस्कुल वाशिम ४१.८६ टक्के, रेखाताई राष्ट्रीय कन्या विद्यालय वाशिम ८२.७८ टक्के, परमवीर अब्दुल हमीद उदरु विद्यालय वाशिम ८८.४६ टक्के, राधादेवी बाकलीवाल कन्या विद्यानिकेतन वाशिम ८२.९७ टक्के, लक्ष्मीनारायण ईन्नानी हायस्कुल वाशिम ६0 टक्के, मालतीबाई सरनाईक कन्या विद्यालय वाशिम ९४.0१ टक्के, पी.डी. जैन विद्यालय अनसिंग ७५ टक्के, जीजामाता विद्यामंदीर अनसिंग ६४ टक्के, मौलाना आझाद उदरु हायस्कुल अनसिंग ९७.५0 टक्के, श्रीकृष्ण विद्यालय तोंडगाव ८९.६१ टक्के, श्री हनुमान विद्यालय उकळी पेन ९४.५२ टक्के, श्री राजेश्‍वर विद्यालय वांगी ९0.३५ टक्के, विठाबाई पसारकर विद्यामंदीर केकतउमरा ९६.७0 टक्के, नागसेन विद्यालय अडोळी ७८.५७ टक्के, स्वामी विवेकानंद विद्यालय कोकलगाव ८८.११ टक्के, श्री पारेश्‍वर विद्यालय पार्डी टकमोर ९३.७९ टक्के, श्री विठ्ठल विद्यालय पार्डी आसरा ९१.१३ टक्के, संत ज्ञानेश्‍वर टेक्नीकल विद्यालय कळंबा महाली ९४.११ टक्के, यशवंतराव चव्हाण विद्यालय काजळंबा ९७.११ टक्के, स्व. काशिरामजी चौधरी विद्यालय माळेगाव भटउमरा ९८.११ टक्के, श्री लाल बहाद्दुर शास्त्री विद्यालय काटा ९७.२७ टक्के, डॉ. पंजाबराव देशमुख विद्यालय तांदळी हिवरा ७८.८४ टक्के, शिंदे गुरूजी विद्यामंदीर वारला ९७.२७ टक्के, ओंकारेश्‍वर विद्यालय जयपुर ९३.३३ टक्के, विदर्भ विद्यालय पिंपळगाव ९७.६१ टक्के एवढे विद्यार्थी उत्तीर्ण झाले. श्रीराम चरणदासबाबा विद्यालय फाळेगाव ९६.५१ टक्के, स्व. नामदेवराव राजगुरू विद्यालय धुमका बोराळा ८७.८0 टक्के, संस्कार सदन विद्यामंदीर अनसिंग ८२.१४ टक्के, श्री गजानन महाराज विद्यालय सावरगाव जीरे ८९.0९ टक्के, ज्ञानराज माऊली विद्यालय तोरणाळा जोडगव्हाण ९५.२३ टक्के, श्री छत्रपती शिवाजी विद्यालय राजगाव ८८.८८ टक्के, श्री गजानन महाराज विद्यालय बाभुळगाव ९६.८७ टक्के, हाजी बद्रृद्दीन बेनीवाल उदरु हायस्कुल वाशिम ९७.६७ टक्के, श्री शरद पवार माध्यमिक विद्यालय सुपखेला ९५.७४ टक्के, श्री विठ्ठल विद्यालय तामसी ९0.६९ टक्के, राजमाता जिजाऊ विद्यामंदीर तामसी ९६.१५ टक्के, श्री बिरूजी पाटील मस्के विद्यामंदीर वाई ९८.३६ टक्के, श्री काशिरामजी पाटील विद्यामंदी सुपखेला ९७.९१ टक्के, जागेश्‍वर विद्यालय कार्ली ९६.0६ टक्के, श्री रघुनाथ स्वामी विद्यालय सोयता ९४.२३ टक्के, विवेकानंद विद्यालय वारा जहाँगिर ९६.७७ टक्के, सौ. सुशिलाबाई जाधव विद्यानिकेतन लाखाळा वाशिम ९१.९३ टक्के, श्री राजीव गांधी विद्यालय वाशिम ६८.४२ टक्के, गौरिशंकर माध्यमिक विद्यालय वाशिम ८५.७१ टक्के, श्री ज्ञानेश्‍वर माऊली विद्यालय कोंडाळा ९६.९६ टक्के, लायन्स विद्या निकेतन माध्यमिक विद्यालय वाशिम ९८.११ टक्के, नालंदा आश्रम शाळा अडोळी ५२.३0 टक्के, श्री मैनागिरी महाराज विद्यालय टो जुमडा ९0 टक्के, स्व. हौसाजी काटेकर विद्यालय एकांबा ४४.४४ टक्के, संत ज्ञानेश्‍वर विद्यालय आसोला ९0.२४ टक्के एवढी विद्यार्थी उत्तीर्ण झाले.