शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
5
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
6
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
7
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
8
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
9
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
10
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
11
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
12
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
13
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
14
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
15
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
17
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
18
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
19
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
20
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त

साहेब, या चिखलातून आणखी किती दिवस अंगणवाडीत जावे लागणार? चिमुकल्यांचा सवाल

By संतोष वानखडे | Updated: July 9, 2024 18:43 IST

स्थानिक प्रशासन रस्ता कामाकडे लक्ष देईना

वाशिम : आकांक्षित वाशिम जिल्ह्यातील आरोग्य व शिक्षणावर जिल्हा प्रशासनाने ‘फोकस’ केले असतानाही, स्थानिक प्रशासन मात्र या गंभीर मुद्याकडे फारसे लक्ष द्यायला तयार नसल्याचे चिखलमय रस्त्यावरून दिसून येते. लोणी बु. येथील झोपडपटीकडे जाणारा चिखलमय रस्ता तुडवत चिमुकल्यांना अंगणवाडी जावे लागत आहे.ग्रामीण भागात अद्यापही फारशा मुलभूत सुविधा उपलब्ध नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. 

रिसोड तालुक्यातील लोणी बु. येथील झोपडपट्टीकडे जाणाऱ्या रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली आहे. थोडा जरी पाऊस आला तरी रस्त्यावर चिखल होतो. हा रहदारीचा रस्ता असल्याने येथून नागरिकांची ये-जा असते. या रस्त्यानेच चिमुकल्या विद्यार्थ्यांना अंगणवाडीत जावे लागते.  पावसाळ्याचे दिवस असल्याने या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य आहे. चिखलमय रस्ता पाहून अनेकदा चिमुकली मुले अंगणवाडी जाण्यासाठी टाळाटाळ करतात. मात्र, शिक्षणाशिवाय तरणोपाय नसल्याने पालकवर्ग हा आपल्या पाल्याचे मन वळवित त्यांना अंगणवाडीत जाण्यासाठी प्रोत्साहित करतात. 

चिखलातून वाट शोधत चिमुकले अंगणवाडी केंद्र गाठत आहेत. रस्ता दुरूस्तीची मागणी अनेकवेळा करण्यात आली. परंतू, अद्यापही ना स्थानिक प्रशासनाने दखल घेतली, ना पंचायत समिती प्रशासनाने या रस्त्याबाबत चिमुकल्यांसह पालकांना आश्वस्त केले. शाळेत जाण्यासाठी चांगला रस्ता मिळत नसेल तर चिमुकल्या मुलांच्या मनावर नकारात्मकेचे भाव उमटण्याची भीतीही पालकांमधून वर्तविली जात आहे. 

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी ग्रामीण भागातील शिक्षणावर विशेष भर दिल्याचे सर्वश्रूत आहे. जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी केंद्रांचे रुपडे पालटण्यावर, इमारती बोलक्या करण्यावर त्यांचा विशेष भर आहे. त्यांच्या या कार्यामुळे ग्रामीण भागातील पालकवर्गही भारावून गेला असून, चांगल्या प्रतिक्रिया उमटत आहेत. येत्या आठ दिवसात या रस्त्याचा प्रश्न निकाली निघाला नाही तर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी पालकवर्गातून होत आहे.

टॅग्स :washimवाशिम