शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

वयोवृद्ध दाम्पत्यांच्या संरक्षणासाठी सरसावली पोलिस यंत्रणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 15:06 IST

संबंधित वयोवृद्ध दाम्पत्याचे संरक्षण करण्यासोबतच त्यांना जाणवणाºया अडीअडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

- सुनील काकडे  लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शहरातील उच्चभ्रू वसाहतींमध्ये वास्तव्य करणाऱ्या अनेकांची मुले शिक्षणानिमित्त परदेशात, परगावात गेलेली असून अनेकांनी बाहेरच आपला संसार थाटला आहे. अशा घरांमध्ये केवळ वयोवृद्ध दाम्पत्य उरले असून त्यांच्या संरक्षणासाठी, त्यांना उतारवयात जाणवणाºया अडीअडचणी सोडविण्यासाठी वाशिमचीपोलिस यंत्रणा सरसावली आहे.जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी हे वाशिम पोलिस दलात जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून मार्च २०१९ या महिन्यात रुजू झाले. तेव्हापासून त्यांनी गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासोबतच पोलिस दलाची जनमानसात प्रतीमा उंचावण्यासाठी विविध स्वरूपातील समाजोपयोगी उपक्रम राबविले. त्याचाच एक भाग म्हणून वाशिम शहरातील वसाहतींमधील घरांमध्ये मुलांशिवाय वास्तव्य करणाºया वयोवृद्ध पती-पत्नीला उतारवयात मदतीचा हात मिळावा, यासाठी महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यासंदर्भात माहिती देताना पोलिस अधीक्षक परदेशी यांनी सांगितले, की शहरातील मुलींच्या सुरक्षेसाठी गठीत करण्यात आलेल्या निर्भया पथकाने त्या कामाला न्याय देण्यासोबतच शहरातील ज्या घरांमध्ये केवळ वयोवृद्ध दाम्पत्य वास्तव्याला आहे, त्या घरांना दररोज न चुकता भेटी देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामाध्यमातून संबंधित वयोवृद्ध दाम्पत्याचे संरक्षण करण्यासोबतच त्यांना जाणवणाºया अडीअडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. याशिवाय त्यांच्याशी बोलून त्यांना मानसिक आधार देण्याचे काम केले जात आहे. निर्भया पथकातील ५ महिला पोलिस कर्मचाऱ्यांकडून हे काम इमानेइतबारे सुरू असून दर सोमवारी त्याचा आढावा देखील घेण्यात येतो, असे पोलिस अधीक्षक परदेशी यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमPoliceपोलिस