शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सेनगाव ते मालेगाव महामार्गावर चुकीच्या ठिकाणी दिशादर्शक फलक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 18:25 IST

Sengaon to Malegaon highway News वाहनचालकांची दिशाभूल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

मालेगाव : सेनगाव ते मालेगाव या ४६१ ब या राष्ट्रीय महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात असून, चुकीच्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात येत असल्याने वाहनचालकांची दिशाभूल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ४६१ ब क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम आता शेवटच्या टप्प्यात आले आहे. सध्या नाल्या, रस्त्याच्या बाजूला माहिती फलक, दिशादर्शक फलक व  मॅग्नेटिक पट्ट्या लावण्याचे काम सुरू आहे. दिशादर्शक फलक लावताना कोणत्याही प्रकारचे तारतम्य दिसत नाही. त्यामुळे वाहनधारक संभ्रमात पडून दिशा चुकत आहेत. मालेगाव शहराजवळील एका रस्त्यावर विद्युत उपकेंद्राजवळ  एक दिशादर्शक फलक चुकीच्या ठिकाणी लावला असून त्यावर चुकीच्या दिशेने बाण दाखविले आहे. रिसोडकडे जाणारे वाहनचालक हे मेहकरकडे जात आहेत. तर मेहकरकडे  दर्शवलेल्या बाणाकडे मेहकरचा  रस्ता नाही. त्यामुळे  वाहनचालकांना पुढे अर्धा किलोमीटर जाऊन नागपूरच्या मार्गाने जावे लागत आहे. हा चुकीचा फलक पाहून वाहनचालकांमधून संताप व्यक्त होत आहे. हे फलक पेव्हर ब्लॉकवर लावल्यामुळे हा रस्ता बंद झाला आहे. पेव्हर ब्लॉकवर फलक लावल्यामुळे पादचाऱ्यांना सुद्धा तेथून जाता येत नाही. चुकीच्या ठिकाणी लावलेला  फलक रस्त्याच्या बाजूला लावण्यात यावा व दिशादर्शक फलक बदलावा अशी मागणी होत आहे.

टॅग्स :washimवाशिमhighwayमहामार्ग