शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विभागातील प्रकल्पांच्या पातळीत लक्षणीय वाढ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 15:52 IST

गतवर्षी २९ जून रोजी ६.९५ टक्के साठा होता, तर यंदा याच तारखेपर्यंत त्यात १६.२४ टक्क्यांनी वाढ होऊन जलसाठा २३.१९ टक्के झाला आहे.

लोकमत न्युज नेटवर्कवाशिम: अमरावती विभागातील १० मोठे आणि २५ मध्यम ्या प्रकल्पांसह मिळून ४४६ लघू प्रकल्पांच्या पातळीत जून महिन्याच्या अखेरपर्यंतच लक्षणीय वाढ झाली आहे. या प्रकल्पांत गतवर्षी २९ जून रोजी ६.९५ टक्के साठा होता, तर यंदा याच तारखेपर्यंत त्यात १६.२४ टक्क्यांनी वाढ होऊन जलसाठा २३.१९ टक्के झाला आहे. तथापि, १० पैकी तीन मोठ्या प्रकल्पांत अद्यापही शुन्य टक्के साठा आहे.अमरावती विभागात अकोला, बुलडाणा, यवतमाळ आणि अमरावती या जिल्ह्यांत १० मोठे, २५ मध्यम आणि ४११ लघू प्रकल्प मिळून एकूण ४४६ प्रकल्प आहेत. गतवर्षी पावसाळ्याला विलंब झाल्याने जूनअखेरपर्यंतही या प्रकल्पांच्या पातळीत फारशी वाढ झाली नव्हती. त्यामुळे हजारो गावांत पाणीटंचाईची समस्याही कायमच होती. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जून महिन्यात समाधानकारक पाऊस पडला. त्यातच गतवर्षीच्या नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यांतील अवकाळी पावसामुळे प्रकल्पांतील पातळीला आधार झाला होता. त्याचा सकारात्मक परिणाम यंदाच्या जून महिन्यातील पातळीवर झाला आहे. सद्यस्थितीत अमरावती विभागातील ४४६ प्रकल्पांत मिळून २३.१९ टक्के उपयुक्त साठा आहे. गतवर्षी २९ जूनपर्यंत या प्रकल्पांत केवळ ६.९५ टक्के साठा होता. विभागातील १० मोठ्या प्रकल्पांच्या पातळीचा विचार करता गतवर्षी या प्रकल्पांत २९ जून रोजी केवळ ७.२१ टक्के उपयुक्त साठा होता. यंदा मात्र याच तारखेपर्यंत त्यात २५.३३ टक्के वाढ होऊन जलसाठा ३२.५४ टक्के झाला आहे. विभागातील २५ मध्यम प्रकल्पांत मिळून २९ जूनपर्यंत १८.९६ टक्के उपयुक्त साठा आहे. गतवर्षी याच तारखेपर्यंत विभागातील मध्यम प्रकल्पांत केवळ १२.३३ टक्के उपयुक्त साठा होता. अर्थात मध्यम प्रकल्पांची पातळी गतवर्षीच्या तुलनेत यंदा २९ जूनपर्यंत ६.३३ टक्क्यांनी वाढली आहे. लघूप्रकल्पांत फारशी वाढ नाहीविभागातील मध्यम आणि मोठ्या प्रकल्पांच्या पातळीत लक्षणीय वाढ दिसून येत असली तरी लघू प्रकल्पांच्या पातळीवर विशेष फरक पडलेला नाही. विभागातील ४११ मध्यम प्रकल्पांत मिळून २९ जूनपर्यंत ३.५२ टक्के उपयुक्त साठा आहे. गतवर्षी याच तारखेपर्यंत विभागातील मध्यम प्रकल्पांत केवळ २.९ टक्के उपयुक्त साठा होता.

टॅग्स :washimवाशिमDamधरण