शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

ट्रान्सफॉर्मरअभावी शिरपूरचा पाणीपुरवठा प्रभावित 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 13:26 IST

शिरपूर ग्रामपंचायतची पाणीपुरवठा योजनाही वीज पुरवठ्याअभावी प्रभावित झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना हिवाळ्यातच पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क शिरपूर जैन (वाशिम) : येथून जवळच असलेल्या खंडाळा वीज उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मर महावितरणने मागील महिन्यात कारंजा तालुक्यातील कामरगाव येथे स्थलांतरित केल्याने शेतकºयांना सिंचनात अडथळे निर्माण झाले असतानाच आता शिरपूर ग्रामपंचायतची पाणीपुरवठा योजनाही वीज पुरवठ्याअभावी प्रभावित झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना हिवाळ्यातच पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.महावितरण कंपनीने १७ सप्टेंबर रोजी शिरपूर येथील खंडाळा विज उपकेंद्रातील ५ एमव्हीए ट्रान्सफॉर्मर कामरगाव येथी वीज उपकेंद्रात नेऊन बसविला. त्यामुळे खंडाळा वीज उपकेंद्रावर अवलंबून असलेल्या कृषीपंपधारक शेतकºयांना सिंचन करणे कठीण झाले आहे. ऐन दूर्गोत्सव काळात आधीच भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. त्यातच ट्रान्सफॉर्मर काढून नेल्याने इतर टट्रान्सफॉर्मरवर अतिरिक्त भार येऊन शिरपूर परिसरातील वाघी, खंडाळा, ढोरखेडा, कोठा, शेलगाव खवणे, ताकतोडा येथील शेतकºयांचा वीज पुरवठा वारंवार खंडीत होत आहे. शेतकºयांची समस्या अद्याप सुटली नाही. आता याच उपकेंद्रातून शिरपूर जैन ग्रामपंचायतच्या बोराळा प्रकल्पावरील मोटर पंपाला एक्सप्रेस फिडरद्वारे होणारा वीज पुरवठाही अनियमित होत आहे. ट्रान्सफॉर्मरचा अभाव असल्यामुळेच येथे वीज पुरवठा खंडीत होण्याची समस्या निर्माण होत असल्याने शिरपूर येथील पाणीपुरवठा प्रभावित झाला आहे. खंडाळा येथून काढून नेलेले ट्रान्सफॉर्मर चार ते पाच दिवसात पुन्हा लावण्यात येईल, असे आश्वासन महावितरणच्या अधिकाºयांनी दिले होते; परंतु अद्याप तरी त्या आश्वासनाची पूर्तता करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकºयांच्या शेती सिंचनासह शिरपूर गावचा पाणीपुरवठा प्रभावी झाल्याने परिसरात विज वितरण कंपनीबाबत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणीmahavitaranमहावितरण