शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

शेडनेट अनुदानप्रकरणी शेतकऱ्यांना कारणे दाखवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 14:55 IST

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांनी कारणे दाखवा नोटीस बजावल्याने शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककिनखेडा (वाशिम) : रिसोड तालुक्यातील जवळपास ५२ ते ५४ शेडनेट हाऊस, पॉली हाऊस उभारणी केलेल्या शेतकऱ्यांना दिलेले अनुदान हे अतिप्रदान झाल्याचा ठपका ठेवत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांनी कारणे दाखवा नोटीस बजावल्याने शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.सन २०१६ -१७ व २०१७ -१८ यावर्षी जिल्हयात २५० ते ३०० शेडनेट हाऊसची उभारणी करण्यात आली. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान तथा राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सदर अनेक शेतकºयांना मार्च २०१७ व २०१८ मध्येच  ५० टक्के अनुदान कृषी विभागामार्फत वाटप करण्यात आले,. परंतु अचानक २५ ते २७ सप्टेंबर २०१९ दरम्यान रिसोड तालुक्यातील अनुदान प्राप्त सर्व ५२ ते ५४ शेतकºयांना कृषी सहाय्यकामार्फत १० गुंठे शेतकºयांना ५० हजार तर २० गुंठे शेतकºयांना १ लाख शासन खाती जमा करण्यासंदर्भात कारणे दाखवा नोटीस देण्यात आल्या. त्यामुळे शेतकºयांमध्ये एकच खळबळ उडाली. दरम्यान सदर नोटीस या ३१ आॅगस्ट २०१९ च्या तारखेत काढल्या असुन शेतकºयाना २५ ते २७ सप्टेंबर दरम्यान देण्यात आल्या. नोटीसमध्ये नमूद आहे की, अनुदान अदा केल्यानंतर दक्षता पथक कृषी आयुक्तालय पुणे यांच्या नोव्हेंबर २०१८ मध्ये झालेल्या क्षेत्रीय तपासणीमध्ये आपल्या संरक्षीत शेती प्रकल्पामध्ये सिंचन सुविधा, ठिंबक, फागर्स व कंट्रोल, हेड आदी कामे केल्याचे आढळुन आले नाही; परंतू प्रस्तावासोबत देयक सादर करुन अनुदान मागणी केली. प्रत्यक्ष काम न करता अदा करण्यात आलेली रक्कम शासन खाती जमा करण्याचा आदेश सदर पत्रान्वये देण्यात आला. अनुदान जमा न केल्यास शासन निर्णयानुसार कार्यवाही करण्याचे सूचित करण्यात आले आहे. सदर बाबीस शेतकरी, संबंधित पुरवठादार व तपासणी अधिकारी यांनी शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी नियमानुसार कार्यवाही का करण्यात येऊ नये याबाबत म्हणणे सादर करण्याचे म्हटले आहे. या प्रकारामुळे शेडनेट अनुदान प्राप्त शेतकरी चांगले अडचणीत आले आहेत.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी