शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’चा दणका : गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 12:38 IST

गैरहजर कर्मचाºयांकडून खुलासे मागविण्यात येणार असून, दोषी आढळून येणाºयांविरूद्ध कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार २८ जुलै रोजी मतदान केंद्रांवर राबविण्यात आलेल्या मोहिमेदरम्यान काही ठिकाणी कर्मचारी अनुपस्थित आढळून आले. गैरहजर कर्मचाºयांकडून खुलासे मागविण्यात येणार असून, दोषी आढळून येणाºयांविरूद्ध कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला.विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात १५ जुलैपासून नवीन मतदारांची नोंदणी मोहिम राबविली जात आहे. मतदार नोंदणीपासून कुणीही वंचित राहू नये तसेच मतदार कार्डामधील चुकांची दुरूस्ती व्हावी याकरीता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, निवडणूक विभाग व गावपातळीवरील कर्मचाºयांची फौज नवमतदारांच्या सेवेत तैनात करण्यात आली आहे. सुट्टीच्या दिवशीही मतदान केंद्रांवर उपस्थित राहून मतदार नोंदणी मोहिम राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी यंत्रणेला दिले होते.मोहिमेची अंमलबजावणी प्रभावी व्हावी याकरीता जिल्हाधिकारी मोडक व संबंधित तहसिलदारांनी रविवार, २८ जुलै रोजी काही मतदानकेंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. दरम्यान, लोकमत चमूने रिसोड शहरासह काही ठिकाणी दुपारच्या सुमारास मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली असता काही ठिकाणी कर्मचारी आढळून आले नाहीत तर काही ठिकाणी संबंधित मतदान केंद्र कुलूपबंद आढळून आले. यामध्ये रिसोड शहरातील सर्वाधिक सात मतदान केंद्रांचा समावेश होता. यासंदर्भात ‘लोकमत’ने २९ जुलै रोजी वृत्त प्रकाशित करताच, प्रशासनाने दखल घेतली असून संबंधितांकडून खुलासे मागविण्यात आले आहेत. रिसोड शहर व तालुक्यातील संबंधित मतदान केंद्रांची माहिती घेऊन सर्वांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचे तहसिलदार राजेश सुरडकर यांनी स्पष्ट केले.वाशिम तालुक्यातील पांडवउमरा परिसरातील मतदान केंद्रासंदर्भात वरिष्ठांकडे अहवाल पाठविण्यात आला आहे. मतदार नोंदणी करण्याचे आवाहनविशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत नवीन मतदारांची नोंदणी मोहिम १५ जुलैपासून जिल्ह्यात राबविली जात आहे. १५ जुलै ते ३० जुलै २०१९ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. या कालावधीत मतदार यादीमध्ये नाव नोंदविता येणार आहे तसेच मतदार यादीतील दुरुस्ती, सुधारणाही करता येणार आहे. या मोहिमेदरम्यान प्रत्येक पात्र व्यक्तीचे नाव मतदार यादीत आहे किंवा नाही याची खात्री करावी आणि नाव नसल्यास ३० जुलैपर्यंत आवश्यक त्या कागदपत्रांसह नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी केले आहे.

टॅग्स :washimवाशिम