शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

भरचौकातील दुकाने रात्री उशिरापर्यंत उघडीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 11:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : जिल्हाधिकारी यांनी १३ जुलै रोजी काढलेल्या आदेशानुसार कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता शहरातील प्रतिष्ठाने उघडण्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हाधिकारी यांनी १३ जुलै रोजी काढलेल्या आदेशानुसार कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता शहरातील प्रतिष्ठाने उघडण्याची व बंद करण्याच्या वेळेत बदल केला आहे. परंतु वाशिम शहरातील भरचौकातील काही दुकाने चक्क रात्री ९ ते ९.३० वाजेदरम्यान उघडी आढळून आलीत. दुकाने बंद करण्याची वेळ ही दुपारी २ वाजेपर्यंतचीच आहे.जिल्हाधिकारी यांच्या १३ जुलै रोजीच्या आदेशान्वये मालेगाव, वाशिम, कारंजा लाड व मानोरा या शहरांमध्ये १५ जुलै ते ३१ जुलै दरम्यान यापूर्वी परवानगी दिलेली सर्व दुकाने, आस्थापना, बँक सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. केवळ दवाखाने (पशुवैद्यकीयसह), मेडिकल २४ तास सुरु थावण्यास मुभा देण्यात आली आहे. वरील सहाही शहरांमध्ये केवळ दुध संकलनास सायंकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत मुभा राहणार आहे. मात्र, या काळात दुध विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. दुपारी दोन वाजता दुकाने बंद करण्याच्यावेळी वाशिम शहरातून पोलीसांचे वाहन फिरुन उघडी असलेली दुकाने बंद करण्याचे भोंग्याव्दारे आवाहन करुन दुकाने बंद केली जातात. पोलीसांची गाडी आली की, दुकानांची शटर फटाफट दुकानदारांकडून खाली ओढल्या जातात. पोलीस निघून गेल्यानंतर पुन्हा अर्ध शटर उघडून काही जण उघडतांना दिसून आले आहेत. वाशिम शहरातील मुख्य चौक असलेल्या पाटणी चौकात रात्री ९.५४ मिनिटापर्यंत एक दुकान उघडे आढळून आले. या दुकानाचे छायाचित्र घेत असतांना ताबडतोब शटर खाली करण्यात आले . तसेच अकोला नाका परिसरातील नगरपरिषद कॉम्पलेक्समधील दुकान ९.२२ मिनिटापर्यंत उघडेच होते.

पोलिसांची गाडी येताच नावापुरती दुकाने बंदकाही प्रतिष्ठान चालकांकडून दुकाने बंद करण्याच्या वेळा पाळण्यात येत नसल्याचे चित्र वाशिम शहरात दिसून येत आहे. सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत मुभा देण्यात आल्याानंतरही काही दुकाने दुपारी २ वाजतानंतर दुकानाचे अर्ध शटर बंद करुन ग्राहकांना आतमध्ये घेवून व्यवहार करीत असल्याचे दिसून येतात. दुपारी दोन वाजल्याबरोबर वाशिम पोलीस विभागाच्यावतिने वाहने फिरवून उघडी असलेल्या दुकानदारांना दुकाने बंद करण्यास भाग पाडत आहेत. यातही काही महाभाग दुकानदार पोलीसांची गाडी आल्यानंतर दुकान बंद करण्याच्या प्रक्रीयेस सुरुवात करताना दिसून येत आहेत. पोलीस निघून गेली की दुकाने पुन्हा काही वेळ सुरु दिसून येतात.

नियमांची कडक अंमलबजावणी आवश्यकनिर्धारित वेळेनंतरही सुरु राहणाऱ्या दुकानाबाबत प्रशासनाने कडक अंमलबजावणी करणे गरजेचे झाले आहे.

दुधांचे स्टॉलही उघडेचदुध संकलनास सायंकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत मुभा राहणार आहे. मात्र, या काळात दुध विक्री करण्यास मनाईचे आदेश असतांना दुध विक्री सुरु दिसून येत आहे.

टॅग्स :washimवाशिमMarketबाजार