शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

शॉकसर्किटने आग लागून दोन गोठे व वैरण जळून खाक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 15:13 IST

शिरपूर जैन ( वाशिम) -  वसारी ता. मालेगाव येथे ३१ मार्च च्या दुपारी १२ वाजता शाँर्टसर्किट होऊन दोन गोठे व पाच जणांची वैरण जळून खाक झाल्याची घटना घडली.    

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन ( वाशिम) -  वसारी ता. मालेगाव येथे ३१ मार्च च्या दुपारी १२ वाजता शाँर्टसर्किट होऊन दोन गोठे व पाच जणांची वैरण जळून खाक झाल्याची घटना घडली.                                                                शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वसारी येथे ३१ मार्चला दुपारी १२ वाजता वीज वाहिनीची शॉर्टसर्किट होऊन आग लागण्याची घटना घडली. या आगीमध्ये विठ्ठल नामाजी जाधव यांच्या शेतातील  गोठा, वैरण सह ट्रॅक्टर व जेसीबी चे साहित्य जळून खाक झाले. वसंता कढणे यांचाही गोठा व वैरण पूर्णता जळाली. प्रल्हाद जाधव, दामोदर जाधव, गजानन जाधव या शेतकऱ्याच्या शेतातील वैरण, लाकुड फाटा आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. आग विझविणण्यासाठी रिसोड व वाशिम नगर परिषदचे अग्नि बंबाची मदत घेण्यात आली होती. तसेच आग विझविण्यासाठी मालेगाव ते रिसोड रस्ता कामात वापरण्यात येणाऱ्या पाण्याच्या टँकरची ही मदत घेण्यात आली. घटनास्थळी शिरपूर पोलीस संबंधित ग्रामसेवक व तलाठी यांनी भेट दिली. या घटनेमध्ये एकूण तीन लाख रुपयाचे शेतकऱ्याचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती उपस्थितांकडून मिळाली आहे.

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैनfireआग