लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : तालुक्यातील खंडाळा येथील काैटुंबिक भांडणातून महिलेला मारहाण करीत उंदीर मारण्याचे औषध पाजल्याची घटना १५ डिसेंबर रोजी घडली. याप्रकरणी मानोरा पोलिसांनी चार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.आश्विन भाऊराव राठोड (२५) यांच्या फिर्यादीनुसार, आरोपी अरुण वासुदेव आडे, कविता अरुण आडे, शिल्पा नीलेश राठोड व शिल्पा अरुण आडे सर्व रा. खंडाळा यांनी फिर्यादीच्या घरात घुसून घरातील साहित्य फेकून दिले. काही आरोपींनी फिर्यादीच्या आईला लाथाबुक्यांनी मारहाण केली तसेच खिशातून उंदीर मारण्याची पावडर फिर्यादीच्या आईच्या तोंडात टाकली. त्यामुळे उलट्या होऊन ती महिला बेशुद्ध पडली. या फिर्यादीवरून चार आरोपीविरुद्ध कलम ४५२, २९४, ३२३, ३२८, ३०७, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहे.
धक्कादायक.... महिलेला उंदीर मारण्याचे औषध पाजले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 12:08 IST
Crime News मानोरा पोलिसांनी चार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
धक्कादायक.... महिलेला उंदीर मारण्याचे औषध पाजले
ठळक मुद्दे आरोपींनी फिर्यादीच्या आईला लाथाबुक्यांनी मारहाण केली उंदीर मारण्याची पावडर फिर्यादीच्या आईच्या तोंडात टाकली.