शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

‘जय जिजाऊ, जय शिवराय’च्या गजराने दुमदुमली वाशिम नगरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 18:19 IST

वाशिम : स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३८९ व्या जयंतीचा सोहळा १९ फेब्रूवारीला जिल्हाभरात हर्षोल्लासात साजरा झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३८९ व्या जयंतीचा सोहळा १९ फेब्रूवारीला जिल्हाभरात हर्षोल्लासात साजरा झाला. यानिमित्त निघालेल्या भव्य रॅलीत झालेल्या ‘जय जिजाऊ, जय शिवराय’च्या गजराने वाशिम नगरी अक्षरश: दुमदुमून गेली.सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून वाशिममध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो. त्यानुसार, यंदाही उत्सव समितीचे अध्यक्ष शिखरचंद बागरेचा यांच्यासह अन्य पदाधिकारी व सर्वधर्मीय समाजबांधवांच्या पुढाकारातून हो सोहळा हर्षोल्लासात साजरा झाला. सकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महारांच्या पुतळ्यांचे पूजन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.  त्यानंतर खासदार भावना गवळी, उपविभागीय पोलिस अधीकारी डॉ. पवन बनसोड, उपविभागीय अधिकारी अभिषेक देशमुख, मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष अशोकराव महाले यांनी झेंडी दाखवून रॅलीला सुरूवात झाली. शहरातील मुख्य मार्गावरून मार्गक्रमक करत छत्रपती शिवाजी महाराज चौकात रॅलीचा समारोप झाला. या रॅलीमध्ये रिठद येथील शिवशंभो ढोलताशा पथक आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. ढोलताशा पथकाच्या मागे सजविलेल्या शिवरथावर जिजाऊ व शिवरायांच्या भूमिकेत चिमुकले आरूढ झाले होते. साबीर शेखने साकारली शिवाजी महाराजांची वेशभूषासार्वजनिक शिवजयंती उत्सवात शिवरथावर साबीर इसाक शेख या मुलाने छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा साकारली; तर राजमाता जिजाऊंच्या वेशभूषेत असलेल्या अंजली नरेंद्रसिंह ठाकूर हिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. साबीर शेख याने समारोपीय कार्यक्रमस्थळी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर मनोगत व्यक्त करून उपस्थितांची वाहवा मिळविली. पुलवामा घटनेतील शहीद जवानांना श्रद्धांजली!शिवजयंतीच्या समारोपीय कार्यक्रमाची सुरूवात जिजाऊ वंदनेने झाली झाली. यावेळी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमस्थळी शहीद जवानांच्या स्मरणार्थ रेखाटण्यात आलेल्या रांगोळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

टॅग्स :washimवाशिमShivjayantiशिवजयंती