वाशिम : छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी - जय शिवाजी, जय जिजाऊ - जय शिवरायांच्या जयघोषाने शुक्रवारी जिल्हाभरातील गावे व शहरे दणाणून सोडली. संपूर्ण जिल्ह्यात शहरे व गावागावांमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. वाशिम येथे शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सर्व संघटना व सर्व पक्षांच्या वतीने एकच शिवजयंती उत्सव साजरा करण्याची परंपरा यावर्षीही कायम ठेवण्यात आली. सकाळी १0 वाजता विठ्ठलवाडी येथून रॅलीला सुरुवात करण्यात आली. रॅलीमध्ये लहान मुले, महिला, तरुणांसह वारकरी सहभागी झाले होते. विठ्ठलवाडी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पाटणी चौक मार्गे रॅली शिवाजी चौकात पोहोचली. विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा यामध्ये सहभाग होता. त्यानंतर शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला मार्ल्यापण करून कार्यक्रम पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष श्रीकृष्ण पाटील होते.
शिवगर्जनेने दुमदुमला आसमंत!
By admin | Updated: February 20, 2016 02:23 IST