शिवाणी बाहेती, अमृता मानधणे यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:42 IST2021-03-17T04:42:58+5:302021-03-17T04:42:58+5:30

डॉ.शिवाणी बाहेती हिने एमजीएम औरंगाबाद येथून एमबीबीएस पदवी प्राप्त केली आहे. तिचे वडील डॉ.जयकिशन बाहेती हे रेडीओलॉजिस्ट असून आई ...

Shivani Baheti, Amrita Manadhane felicitated | शिवाणी बाहेती, अमृता मानधणे यांचा सत्कार

शिवाणी बाहेती, अमृता मानधणे यांचा सत्कार

डॉ.शिवाणी बाहेती हिने एमजीएम औरंगाबाद येथून एमबीबीएस पदवी प्राप्त केली आहे. तिचे वडील डॉ.जयकिशन बाहेती हे रेडीओलॉजिस्ट असून आई भावना बाहेती स्त्रिरोग तज्ञ आहेत. शिवाणी हिने माऊंट कारमेल वाशिम येथून दहावीच्या परिक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त केला होता. पुढील अभ्यासक्रम तिने बेंगलोर येथे पूर्ण केला आहे. तिला पिजी स्किन किंवा रेडीओलॉजीस्टमध्ये करण्याची इच्छा आहे, तर डॉ.अमृता मानधने हिने सुद्धा एमजीएम औरंगाबाद येथून एमबीबीएस पदवी प्राप्त केली आहे. मोठी बहीण रुचा मानधने ही एमडीएस असून अमृताने स्थानिक शांतीनिकेतन येथे दहावी आणि हेडा ज्युनिअर कॉलेज येथून ११ वी व १२ वीचा अभ्यासक्रम पूर्ण केला. सत्कारप्रसंगी आई राजश्री मानधने, वडील राजकुमार मानधने व रुचा मानधने उपस्थित होते.

Web Title: Shivani Baheti, Amrita Manadhane felicitated