शिरपूर आरोग्यवर्धनी केंद्रात ८ मार्चपासून नागरिकांसाठी लसीकरण कार्यक्रम सुरू करण्यात आला. मात्र, योग्य ती जनजागृती नसल्याने लसीकरणाचे काम अतिशय संथ गतीने चालू असल्याचे दिसून येत आहे. ८ ते १८ मार्चपर्यंत वीस हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शिरपूर गावामधील २३५ लोकांचे लसीकरण करण्यात आले. त्यापैकी ३६ जण शिरपूरव्यतिरिक्त गावातील आहेत. म्हणजेच शिरपूर येथील केवळ १९९ जणांना लस देण्यात आली. एकीकडे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यातच आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये नि:शुल्क लस देण्यात येत आहे. निःशुल्क लस घेण्याबाबतही नागरिक उदासीन असतील तर ही बाब गंभीर आहे. याविषयी अधिक जनजागृती होणे गरजेचे आहे.
...........................
प्रशासनाने व्यापाऱ्यांसाठी कोरोना चाचणी अनिवार्य केल्याने व्यापारी मात्र कोरोना चाचणी करण्यासाठी आरोग्यवर्धनी केंद्रात हजेरी लावत आहेत. प्रशासनाने व्यापाऱ्यांना कोराेना चाचणीसाठी २१ मार्च डेडलाईन दिल्याने चाचणीसाठी व्यापाऱ्यांची लगबग दिसून येत आहे.