शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सव्वाशे शेतकऱ्यांच्या वहिवाटीचा प्रश्न निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 17:36 IST

देपूळ (वाशिम): येथून जवळच असलेल्या वारा जहॉगिर प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रात शेतरस्ता गेल्याने १३० शेतकऱ्यांची शेतीच अडचणीत आली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कदेपूळ (वाशिम): येथून जवळच असलेल्या वारा जहॉगिर प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रात शेतरस्ता गेल्याने १३० शेतकऱ्यांची शेतीच अडचणीत आली होती. या संदर्भात शासन, प्रशासनदरबारी पाठपुरावा केल्यानंतर अखेर पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांच्या समस्येची दखल घेत शेतकऱ्यांसाठी पर्यायी रस्त्याचे काम सुरू केले आहे. वारा जहॉगिर येथे २०१५ मध्ये पाटबंधारे विभागाच्यावतीने लघू प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या वहिवाटीचा देपूळ ते पार्डी रस्ता बुडित क्षेत्रात गेला. त्यामुळे १३० शेतकºयांची हजारो एकर शेती संकटात सापडली. शेतीत शेतमाल, शेती अवजारे आणि इतर साहित्याच्या वाहतुकीसाठी बैलगाडी, ट्रॅक्टर ही वाहने नेणेच शेतकºयांना अशक्य झाले. परिणामी अनेकांची शेती पडित राहू लागली होती. पाटबंधारे विभागाच्या तत्कालीन कार्यकारी अभियंत्यांनी या रस्त्यासाठी नियोजन न केल्याने शेतकरी संकटात सापडले होते. त्यानंतर शेतकºयांनी बुडित क्षेत्रात गेलेल्या रस्त्यासाठी पर्यायी रस्ता देण्याच्या मागणीसाठी वेळोवेळी पाटबंधारे विभागाचे उंबरठे झिजविले, जिल्हाधिकाºयांसह प्रशासन दरबारीही निवेदन दिले. त्यानंतर पाटबंधारे विभागाचे विद्यमान कार्यकारी अभियंता एस. डी. जाधव यांनी या रस्त्यामुळे होत असलेली शेतकºयांची अडचण लक्षात घेतली आणि रस्त्याच्या कामासाठी सुधारीत प्रशासकीय मान्यतेची तरतूद केली. तथापि, सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळण्यास विलंब होण्याची शक्यता असल्याने रस्त्याचे कामही रखडणार असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी या संदर्भात पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांशी चर्चा करीत वरिष्ठस्तरावरून रस्ता कामासाठी परवानगी घेत निविदा प्रक्रिया पूर्ण केली. आता या रस्त्याचे कामही सुरु झाले असून, या रस्त्यामुळे परिसरातील १३० शेतकºयांच्या शेती वहितीचा प्रश्न निकाली लागला आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरीDamधरण